रस्ता रुंदीकरणामुळे बहुतेक झाडं व विद्युत खांब हे रस्त्यावर आले. जुन्या पाण्याच्या टाकीजवळील विद्युत ट्रान्स्फाॅर्मर, कामठा चौकातील विद्युत खांब, पोलीस स्टेशन रोडजवळील ट्रान्स्फाॅर्मर अशा अनेक ठिकाणी असलेले खांब अपघातांना निमंत्रण देत आहेत. एकीकडे रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. कुठे एकेरी वाहतूक सुरू आहे, तर कुठे दुहेरी वाहतूक सुरू आहे. यामुळे नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते. यात मध्यातच आलेले हे विद्युत खांब यामुळे केव्हाही एखाद्या वाहनाची या खांबाला धडक बसून मोठा अपघात घडू शकतो. आता तर पावसाळ्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. विद्युत विभागाने या समस्येवर तोडगा काढून नवीन खांब रस्त्याच्या कडेला लावण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अपघातांना निमंत्रण देत आहेत रस्त्यावरील विद्युत खांब ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:21 AM