ठळक मुद्देयेणाऱ्या-जाणाऱ्यांची केली जाते नोंद
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: अवघे जग कोरोनाशी दोन हात करत असताना गोंदिया जिल्ह्यातल्या झाशीनगर या लहानशा गावातील नागरिकांनीही आपला खारीचा वाटा उचलला आहे. कोरोनाबाधितांचे गावात आगमन होऊ नये व गावातला कुणी बाहेर जात असेल तर त्याची दखल घेण्याचा प्रघात या गावकऱ्यांनी पाडला आहे. गावात येणाऱ्या व गावावरून दुसऱ्या गावी जाणाऱ्या प्रवाशांची नावे लिहून ठेवली जात आहेत. तसेच गावात कोणाकडे कोण आले आहे, कशासाठी व किती दिवसांसाठी आले आहे अशी इथ्यंभूत माहिती त्यात लिहिली जाते. यात गावचे सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील व नागरिकांचे सहकार्य लाभत आहे. तसेच गावात बाहेरून आलेल्या व्यक्तींसाठी शाळेतच क्वारंटाईनची सुविधा केली आहे.