लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : या परिसरातील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी जंगलाला लागून असलेल्या शेतांमधील विहिरींवर वनविभागाकडून लोखंडी कठडे बसविण्यात येणार होते. मात्र तीन वर्षांचा काळ लोटूनही विहिरींवर कठडे बसविण्यात आले नाही. उलट या कामासाठी काही शेतकºयांकडून प्रती विहीर ३०० ते ४०० रुपयांची उगाही करण्यात आल्याचे बोलले जात आहे.शेंडा, कोयलारी, कोहळीपार, उशिखेडा व प्रधानटोला येथील काही शेतकºयांची शेती जंगलाला लागून आहे. वन्यप्राण्यांची रेलचेल अधिक प्रमाणात असल्याने कोणताही वन्यप्राणी धोक्याने विहिरीत पडू नये म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाकडून लोखंडी कठडे बसविण्यात येणार होते. या कामासाठी प्रती विहीर ३०० ते ४०० रुपये घेण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ही योजना फसवी होती की, लालच देणारी असे तर्क-वितर्क लावले जात आहेत.सध्या या परिसरातील शेतकºयांची धानपिकाची रोवणी झाली आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवेगार रान दिसते. रात्रीच्या वेळेस जंगलातील सांबर, चितळ, रानडुकर व रानगव्या सारखे वन्य प्राणी याच धान पिकावर ताव मारुन शेतकºयांच्या पिकांचे मोठे नुकसान करतात. त्याचबरोबर प्रसंगावधनाने एखादा वन्य प्राणी विहिरीत पडू शकतो हे नाकारता येत नाही. हीच बाब लक्षात घेवून अशा विहिरींवर लोखंडी कठडे लावण्याचे वनविभागाकडून ठरविण्यात आले होते. त्याचे सर्वेक्षण करुन यादी तयार करण्यात आली होती. मात्र तीन वर्षांचा काळ लोटूनही वनविभागाकडून कोणतेच पाऊल उचलण्यात आले नसल्याने ही योजना फसवी होती की लालच देणारी होती हे कळायला मार्ग नाही.वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी तसेच शेतकºयांचे हित लक्षात घेता जंगल परिसरात तारेचे काटेरी कुंपन करणे तसेच विहिरींना लोखंडी कठडे लावणे गरजेचे आहे. यासाठी वनविभागाने त्वरित दखल घेवून जंगल व शेत शिवारातील विहिरींना लोखंडी कठडे बसविण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. सदर प्रकरणाची माहिती घेण्यासाठी सडक-अर्जुनी येथील वनपरिक्षेत्राधिकारी गोवर्धन राठोड यांचेशी मोबाईलवरुन संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.जंगल परिसरातील विहिरींची पाहणी करुन त्याची यादी वनक्षेत्राधिकारी कार्यालयास सादर करण्यात आली होती. परंतु त्याचे काय झाले हे कळले नाही.- मोहतुरेप्र.क्षेत्रसहायक शेंडा.
विहिरींवर लोखंडी कठडे बसविलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 9:02 PM
या परिसरातील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी जंगलाला लागून असलेल्या शेतांमधील विहिरींवर वनविभागाकडून लोखंडी कठडे बसविण्यात येणार होते. मात्र तीन वर्षांचा काळ लोटूनही विहिरींवर कठडे बसविण्यात आले नाही.
ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : शेतकऱ्यानी केली कठड्यांची मागणी