एकाच दिवशी आठवडाभराच्या स्वाक्षऱ्या : कारवाई न झाल्यास शाळेला कुलूृप ठोकणारलोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : अंजोरा केंद्रांतर्गत येत असलेल्या कवडी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील शिक्षक एस.पी. पारधी यांनी एक दिवस शाळत येवून आठवडाभराच्या स्वाक्षऱ्या केल्याने गावकरी व शाळा सुधार समितीचे पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत.शाळेला सध्या सुटी असल्याने शिक्षकाची एक-एक आठवड्याची पाळी लागत असते. त्यानुसार एस.पी. पारधी यांची १८ ते २५ मे पर्यंतची पाळी लागली होती. मात्र त्यांनी २५ मे रोजी शाळेत येवून पूर्ण आठवडाभरापेक्षा एक दिवस अधिक म्हणजे २६ मे या तारखेत सुद्धा स्वाक्षरी केली आहे. ही बाब शाळा सुधार समितीचे अध्यक्ष तिलकप्रसाद भगत, सदस्य देवेंद्र भोषकर, खेमराज बागडे, प्रिती चौधरी, नंदेश्वरी रहांगडाले, नानू चौधरी, सुरजलाल चौधरी यांच्या लक्षात येताच त्यांनी शिक्षकाशी संपर्क साधून एक दिवस येवून आठवडा भराच्या स्वाक्षऱ्या केल्याबाबत विचारणा केली. परंतु शिक्षक पारधी यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांशी अरेरावीपूर्वक व्यवहार करीत तुम्हाला जे जमेल ते करुन टाका मी बघून घेईन, पगार कुठेच मिळते अशा शब्दामुळे समितीच्या लोकांना ठणकावले. यावर संताप व्यक्त करीत हजेरी रजिस्टरची फोटो काढली. त्यांची तक्रार शिक्षणाधिकारी (प्राथ.) उल्हास नरड यांच्याकडे केली आहे. बेबंदशाही करणाऱ्या शिक्षकांवर काय कारवाई होते याकडे कवडीवासीयांचे लक्ष लागले आहे.उसीरा येणे, लवकर जाणे अशी दिनचर्या असून शिक्षकांच्या अनियमित कारभारामुळे कवळी शाळेतील शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालावला आहे. अनेक पालक आपल्या मुलांच्या शाळा सोडण्याचा दाखला काढण्यासाठी सतत येत असतात. मात्र समितीचे पदाधिकारी शाळेत शिक्षणाचा दर्जा सुधारला जाईल असे पालकांना आश्वासन देत असतात. पालकांनी टी.सी. काढल्यानंतर गावाच्या शाळेतील पटसंख्या कमी होईल, असा उद्देश समितीचा आहे. ५०-५० किलोमिटर दूर अंतरावरुन येणे-जाणे करुन नोकरी करणाऱ्या शिक्षकांच्या अनियमित कारभारामुळे समितीचे पदाधिकारी सुद्धा संतापले आहेत. या आधी सुद्धा शिक्षक एस.पी. पारधी, ए.आर. राठोड यांच्या तक्रारी केल्या होत्या. त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. अनियमित कारभार करीत आहेत. शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या पूर्वी दोषी शिक्षकावर कारवाई झाली नाही तर पालक आणि समितीच्या वतीने शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा शाळा सुधार समितीचे अध्यक्ष तिलकप्रसाद भगत, सदस्य देवेंद्र भोषकर, खेमराज बागडे यांनी दिला आहे.
कवळी शाळेतील शिक्षकांचा अनियमित कारभार
By admin | Published: May 29, 2017 1:57 AM