शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

जिल्हा परिषदचे सिंचन ७९८ प्रकल्प रखडलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 6:00 AM

गोंदिया जिल्ह्यातील ६३ हजार ७०७ हेक्टर शेती सिंचित होऊ शकेल एवढ्या क्षमतेचे प्रकल्प एकट्या जिल्हा परिषदेकडे आहेत. परंतु ह्या प्रकल्पांची दुरूस्ती मागील अनेक वर्षापासून न झाल्यामुळे तलावाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्याअभावी आपली शेतीला सिंचित करता येत नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यात ३५२९ तलाव : दुरुस्तीसाठी ७० कोटींची गरज, शेतकऱ्यांना सिंचनाची होऊ शकते मदत

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासन एकीकडे सिंचन क्षमता वाढविण्यासाठी किंवा भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवित आहे. परंतु तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील ७९८ प्रकल्प पैश्याअभावी रखडले आहेत. जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभागामार्फत सिंचनासाठी ३ हजार ५२९ प्रकल्प आहेत. त्यापैकी ७८९ प्रकल्प रखडले असल्याने तलावांच्या जिल्ह्यात पाण्याचा दुष्काळ आहे.गोंदिया जिल्ह्यातील ६३ हजार ७०७ हेक्टर शेती सिंचित होऊ शकेल एवढ्या क्षमतेचे प्रकल्प एकट्या जिल्हा परिषदेकडे आहेत. परंतु ह्या प्रकल्पांची दुरूस्ती मागील अनेक वर्षापासून न झाल्यामुळे तलावाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्याअभावी आपली शेतीला सिंचित करता येत नाही. शासन जलयुक्त शिवार अभियानाचा गाजावाजा करीत आहे. परंतु या रखडलेल्या या प्रकल्पांची कामे करण्यास उत्सुकता दाखवित नसल्याचे चित्र सद्या उभे आहे. १९० लघु सिंचन तलावपैकी ८८ नादुरूस्त, २९४ कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी ७० नादुरूस्त, १३ उपसा सिंचनापैकी ९ उपसा सिंचन नादुरूस्त, २६ पाझर तलाव आहेत ते संपूर्ण दुरूस्त आहेत.१५४५ साठवण बंधाऱ्यांपैकी १०६ नादुरूस्त, माजी मालगुजारी १४२१ तलावांपैकी ५२५ तलाव नादुरूस्त असल्याची माहिती संबधित विभागाने दिली. यामुळे सिंचनाच्या सोयी करण्यास शासन कसा उदासिन आहे याची प्रचिती येते.गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण करणारा असला तरी या जिल्ह्यातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. शेतकºयांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी सोयीस्कर म्हणून माजी मालगुजारी तलाव आहेत. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ८० टक्के मामा तलावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट असतोे.गोंदिया जिल्ह्यातील १४२१ माजी मालगुजारी तलावांपैकी ५२५ तलावांची दुरूस्ती करण्याची गरज आहे. परंतु दुरूस्ती न झाल्यामुळे शेतकºयांना सिंचन करण्यासाठी पाणी पुरत नाही.परिणामी हे मामा तलाव हिवाळ्यातच कोरडे पडतात. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाºया लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित लघुसिंचन तलाव, कोल्हापुरी बंधारे, उपसा सिंचन योजना, पाझर तलाव, साठवण बंधारे व माजी मालगुजारी तलावात दरवर्षीच पाण्याचा ठणठणाट पडतो.७० कोटीची गरजशासनाने गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत असलेले सिंचन प्रकल्प दुरूस्त करण्याची तयारी दर्शविली तर ७९८ प्रकल्प दुरूस्तीसाठी ६९ कोटी ८१ लाख रूपयाची गरज आहे. सदर प्रकल्पाची दुरूस्ती झाल्यास १८ हजार ९९७ हेक्टर शेती सिंचीत होऊ शकेल. मामा तलावांची दुरूस्ती झाल्यास ९०२० हेक्टर, लपा तलाव दुरूस्त झाल्यास ५४८२ हेक्टर, पाझर तालवाच्या दुरूस्तीमुळे ३२ हेक्टर, कोल्हापूरी बंधाऱ्यांमुळे ३०८० हेक्टर, साठवण बंधाऱ्यांमुळे ५३३ हेक्टर, उपसा सिंचनामुळे ८५० हेक्टर शेती सिंचीत होऊ शकेल.१९ हजार हेक्टर शेती सिंचीतवर्षानुवर्षापासून गोंदिया जिल्ह्यात असलेल्या तलावांमधून आजघडीला १९ हजार २२० हेक्टर शेती सिंचीत होते. मामा तलावांमधून १० हजार ११६ हेक्टर, लपा तलावांमधून ४ हजार ४५८ हेक्टर, कोल्हापूरी बंधाºयांमुळे २ हजार ३९८ हेक्टर, साठवण बंधाºयांमुळे ९९० हेक्टर, उपसा सिंचनामुळे ७५२ हेक्टर शेती सिंचीत होऊ शकते.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प