शहरं
Join us  
Trending Stories
1
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
2
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
3
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
4
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
5
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
6
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
7
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
8
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
9
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
10
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
11
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
12
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
13
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
14
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
15
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
16
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
17
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
18
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
19
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
20
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

नुसतीच फॅशन की जिवाला धोका? गोंदियात ५१७ जणांकडे बंदूक परवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 3:40 PM

शस्त्र बाळगण्याची गरज नसलेल्यांकडेही परवाने : पडताळणी करण्याची आहे गरज

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सध्याच्या डिजिटल युगात स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्यापेक्षा फॅशन म्हणूनच शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढतेय, गोंदियात ५१७ जणांकडे बंदूक परवाने आहेत. राजकीय नेते, व्यापारी यांसह गावगुंडही कमरेला शस्त्र बाळगण्याची फॅशन करीत आहेत. 

शस्त्र परवाना काढण्यासाठीचे नियम अत्यंत कठोर आहेत. परंतु मधला मार्ग काढून अनेक जण शस्त्र परवाने काढण्यात यशस्वी होतात, तर काही जणांना गरज असतानाही अनेक वर्षे शस्त्र परवाना मिळत नाही. त्यामुळे ज्यांना शस्त्र बाळगण्याची गरज नाही, अशा शस्त्रधारी मंडळींची पडताळणी होण्याची गरज आहे. 

शस्त्र परवाना कोणाला दिला जातो ?खरे तर बंदूक परवाना हा काही विशिष्ठ कारणांसाठी दिला जातो. एखाद्याला दुसऱ्यापासून धोका आहे, असे वाटत असेल तर स्वसंरक्षणासाठी तो परवान्याची मागणी करू शकतो. त्याचबरोबर ही प्रामुख्याने दोन कारणे शेतीचे प्राण्यांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी शस्त्र परवाना दिला जातो. हि प्रामुख्याने दोन कारणे शस्त्रांचा परवाना देण्यामागे असतात. मात्र, अनेक जण या दोन्ही कारणांचा वापर केवळ फॅशन म्हणून करतात. आपल्याकडे पिस्तूल आहे, हे समजण्यासाठी अनेक जण कमरेला पिस्तूल लावून समाजात फिरत असतात. यामुळे आपली प्रतिष्ठा वाढेल, अशी त्यांची समजूत असते. पाच वर्षांत वाढले अर्ज वर्षांत शस्त्र परवाना काढणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकांनी स्वसंर क्षणासाठी शस्त्र परवाना काढण्यावर भर दिला आहे. यातील अनेकांना शस्त्र परवाने मिळाले आहेत. 

शस्त्र परवाना काढायचा कसा? कुटुंबातील सर्व सदस्यांचे प्रतिज्ञापत्र, मेडिकल प्रमाणपत्र, पोलिस पाटील, तलाठी दाखला, पोलिसांकडून गुन्ह्यांची पडताळणी होते. जिल्हाधिकारी सुनावणी घेतात. खात्री झाल्यानंतरच परवाना मिळतो.

नियम कडक करण्याची आवश्यकतापरवाना मिळण्यासाठी असलेली प्रक्रिया किचकट असली तरी आणखी नियम कडक करणे गरजेचे आहे. खरी गरज असेल त्यालाच परवाना मिळणे गरजेचे आहे. मात्र, अनेक जण फॅशन म्हणून परवाना घेत आहेत, यावर जरब हवी.

तर होणार कारवाई शस्त्र सांभाळणे कठीण

  • शस्त्राचा चुकीचा वापर झाला तर तो गुन्हा आहे. यासाठी शस्त्र वापरताना नियम पाळावे लागतात. आचारसंहिता काळात शस्त्रे जमा करावी लागतात. जर काही अघटित झाले तर कारवाई होते. 
  • अनेकदा घरामध्ये कौटुंबिक वाद होतात. अशा वेळी रागाच्या भरात परवाना मिळालेल्या शस्त्राचा वापर होऊ शकतो. त्यामुळे शस्त्र सांभाळणे कठीणच आहे. 
  • जिल्ह्यात निवडणूक जाहीर झाल्यानंतर ज्यांच्याकडे शस्त्र परवाने आहेत, त्यांना आपले शस्त्र नजीकच्या पोलिस ठाण्यात जमा करावे लागते.
टॅग्स :gondiya-acगोंदिया