लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात मागील पाच वर्षांत पूर्वीच्या सरकारपेक्षा आमच्या सरकारने दुप्पट काम करुन सुद्धा काही प्रश्न मार्गी लावणे शिल्लक आहे. त्यामुळे ते कसे सोडविता येतील याचा विचार आम्ही करीत आहोत. विरोधकांकडे सध्या कुठलेच मुद्दे नसल्याने ते ईव्हीएमचा मुद्दा पुढे करुन जनतेची दिशाभूल करीत आहे. मात्र हा प्रकार कव्हर फायरिंग करण्यासारखा असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.४) गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.पत्रकार परिषदेला पालकमंत्री डॉ.परिणय फुके, खा.सुनील मेंढे, आ.राजकुमार बडोले, विजय रहांगडाले, संजय पुराम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आ.रमेश कुथे, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लोकशाहीत विरोधी पक्ष असला पाहिजे आणि त्यांनी जनतेचे प्रश्न उचलून धरले पाहिजे ही आपली देखील भूमिका आहे. मात्र विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ईव्हीएमच मुद्दा पुढे करुन आंदोलन करीत आहे.याच मुद्दावर सर्व विरोधकांनी २१ मार्चला महामोर्चाचे आयोजन केले आहे. पण या मोर्चानंतरही विरोधकांचा पराभवच होईल. विरोधकांनी ईव्हीएम खापर फोडण्याऐवजी जनतेने आम्हाला नाकारले याचे आत्मचितंन करावे.राज्यातील जनतेने पुन्हा एकदा आमच्या सरकारला जनादेश देण्याचा संकल्प केला आहे.हे जनादेश यात्रेदरम्यान जनतेचा मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादावरुन दिसून आले. राज्य सरकारने मागील पाच वर्षांत सर्वच क्षेत्रातील अनुशेष दूर केला आहे.गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भरपूर निधी उपलब्ध करुन दिला.गोसेखुर्द प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून १ लाख हेक्टर शेतीला सिंचनाची सोय झाली आहे. दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी एनडीडीबीच्या माध्यमातून ३ हजार गावांमध्ये विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे. बऱ्याच वर्षांपासून रखडलेला शेतकऱ्यांच्या जमिनीचा भोगवटदार वर्ग २ मधून वर्ग मध्ये १ रुपातंर करण्याचा प्रश्न मार्गी लावून जमिनीचा मालकी हक्क प्राप्त करुन दिला. रस्ते, सिंचन आणि पायाभूत सुविधांचा विकास केल्याचे सांगितले.पक्ष हाऊसफुल्ल, मात्र जनाधार असलेल्यांचा विचारइतर पक्षांमधून भाजप येणाऱ्या नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे आता पक्षाने हाऊसफुल्लचा बोर्ड लावला आहे.मात्र जनाधार आणि चांगली प्रतिमा असलेल्या इतर पक्षातील भाजपमध्ये येण्याची ईच्छा असलेल्या नेत्यांचा विचार केला जाईल असे सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील एका नेत्याच्या भाजप प्रवेशाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला.वैद्यकीय महाविद्यालयातील त्रृटी दूर करूगोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे.मात्र यानंतरही काही त्रृटी असतील तर त्या निश्चितपणे लवकरच दूर करु असे सांगितले.
विरोधकांकडे प्रश्न नसल्याने ईव्हीएमचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 9:44 PM
राज्यात मागील पाच वर्षांत पूर्वीच्या सरकारपेक्षा आमच्या सरकारने दुप्पट काम करुन सुद्धा काही प्रश्न मार्गी लावणे शिल्लक आहे. त्यामुळे ते कसे सोडविता येतील याचा विचार आम्ही करीत आहोत. विरोधकांकडे सध्या कुठलेच मुद्दे नसल्याने ते ईव्हीएमचा मुद्दा पुढे करुन जनतेची दिशाभूल करीत आहे. मात्र हा प्रकार कव्हर फायरिंग करण्यासारखा असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.४) गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : पाच वर्षांत सर्वाधिक विकास कामे झाल्याचा दावा