शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

पावसाळ््यातही होतेय अंगाची लाही-लाही

By admin | Published: June 16, 2017 1:04 AM

मृग लागल्यानंतर सुरूवातीचे दोन-तीन दिवस चांगली हजेरी लावल्यानंतर आता मात्र पावसाने दडी मारली आहे.

पावसाने मारली दडी : उकाड्याने नागरिक हैराणलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मृग लागल्यानंतर सुरूवातीचे दोन-तीन दिवस चांगली हजेरी लावल्यानंतर आता मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैरान झाले असून अंगाची लाह-लाही होत आहे. उन्हाळा परतून आल्यासारखे वातावरण तापू लागले असून कधी पाऊस बरसतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ७ जून पासून पावसाळा सुरू होतो. हवामान खात्यानेही यंदा पावसाळा सुरूवातीपासूनच खुश करणार असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र त्यांचा अंदाज चूक ठरत असल्याचेही दिसून येत आहे. सुरूवातीचे दोन-तीन दिवस पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता व सर्वांना उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. वातावरण थंड झाल्याने सर्वच खूश होते. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने दडी मारल्याचे दिसून येत आहे. परिणामी वातावरण पुन्हा तापू लागले आहे. विशेष म्हणजे उन्हापासून पाण्याची वाफ होत असून या उमसमुळे जीव कासावीस होऊ लागला आहे. उन्ह पुन्हा उन्हाळ््यासारखे तापू लागले असून घरा बाहेर पडण्यासाठी विचार करावा लागत आहे. त्यामुळे आता पाऊस लवकर बरसावा यासाठी सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जून महिना आता अर्धा सरला असून फक्त दोन-तीन दिवसच पाऊस पडल्याने हा महिनाही असाच तर निघत नाही ना असा प्रश्न ही पडत आहे. दररोज ढग दाटून येत आहेत, मात्र न बरसताच निघून जातात. आता तरी बरस अशी हाक सर्वच देत आहेत. ९६८.९ मिमी. बरसला पाऊस जिल्ह्यात आतापर्यंत ९६८.९ मिमी. पाऊस बरसल्याची नोंद घेण्यात आली आहे. यात सर्वाधिक पाऊस आमगाव तालुक्यात १९५ मिमी. झाला असून सर्वात कमी पाऊस अर्जुनी-मोरगाव तालुक्यात फक्त ३६.६ मिमी बरसल्याची माहिती आहे. याशिवाय गोंदिया तालुक्यात १०२.१ मिमी., गोरेगाव तालुक्यात १४९.८ मिमी.., तिरोडा तालुक्यात ११५.६ मिमी., देवरी तालुक्यात १२०.४ मिमी.., सडक-अर्जुनी तालुक्यात ९२.३ मिमी तर सालेकसा तालुक्यात १५७.१ मिमी. असा एकूण ९६८.९ मिमी. पाऊस पडला असून त्याची सरासरी २९.२ एवढी आहे. पारा ३८ डिग्रीच्या घरात पावसाळा सुरू झाला असूनही जिल्ह्याचा पारा आजही ३८ डिग्रीच्या घरात आहे. यावरून उकाड्याचा अंदाज लावता येतो. आता पाऊस पडल्यावरच यावर काही तोडगा निघणार व पारा खाली उतरल्यावरच उकाड्यापासून सुटका मिळणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून पाऊस बरसण्याची वाट बघत आहेत.