गोंदिया : आपण उपवासाला साबुदाण्याचा वापर करीत असाल तर ते सोडून द्या. साबुदाणा अत्यंत धोकादायक आहे. शरीरात कार्बोहायड्रेड वाढते. पचायला जड जाते, ज्या व्यक्तीला पातळ संडास होते त्या व्यक्तीला साबुदाणा दिला जातो. ज्यांचे शरीर लठ्ठ आहे, ज्यांना कॅलरीजची गरज नाही किंवा ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांनी साबुदाणा न खाल्लेलाच बरा, असा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जात आहे.
................
दर का वाढले
श्रावण मासाला सुरुवात झाल्याने आता उपवास करणाऱ्यांची संख्या बळावली आहे. हिंदी लोक गुरुपौर्णिमेपासून तर मराठी लोक दीप पूजेपासून श्रावण मास पाळतात. या काळात करणाऱ्या उपवासात साबुदाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याने त्याचे दर वाढले आहेत.
.............
साबुदाणा आरोग्याला हानिकारक आहे
- साबुदाण्यामुळे शरीरात कार्बोहायड्रेड वाढते. त्यामुळे वजन कमी करण्याच्या तयारीत असलेल्यांनी खाऊ नये.
- ज्यांना मधुमेह आजार आहे त्यांनी साबुदाणा खाऊ नये. साबुदाण्यात कॅलरीज जास्त असतात.
- साबुदाणा पचायला जड जातो. ज्यांना पातळ संडास होते त्यांना साबुदाणा देतात. साबुदाण्यामुळे पोट साफ होत नाही.
...............
उपवास आहे, मग हे पदार्थ खा
उपवासात कुकुटच्या पिठाची भाकर, कोहळ्याची भाजी, ऋतूतील फळे, पचायला हलके असलेले पदार्थ उपवासाच्या काळात खावे.
- डॉ. मोसमी ब्राह्मणकर, आहारतज्ज्ञ, गोंदिया.
..............
उपवासाचे पदार्थ दर (प्रति किलो)
पदार्थ----------------१० जुलै----------१० ऑगस्ट
भगर-----------------९०--------------१००
साबुदाणा ------------७०--------------८०
नायलॉन साबुदाणा---९०-------------१००