लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : बदलत्या काळानुसार गोंडी संस्कृतीचा अनेकांना विसर पडला आहे. त्यांचे वाईट परिणाम सुद्धा समाजाला भोगावे लागतात. अशात गोंडी साहित्याच्या माध्यमातून गोंडी संस्कृतीचे जतन करणे शक्य होऊ शकते, असे प्रतिपादन राजमाता फुलवादेवी यांनी केले.धनेगाव येथील आंचलिक भाषा संशोधन केंद्राला भेट दिली असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, गोंडी संस्कृतीला चिरकाळ टिकवून ठेवण्यासाठी गोंडी साहित्य मैलाचा दगड ठरणार आहे. या दिनेशे भाषा संशोधन केंद्र सुरू करुन उषाकिरण आत्राम आणि त्यांच्या सहकाºयांनी मोठी जबाबदारी हाती घेतली आहे. येणाºया काळात गोंडी संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी व ती जोपासण्यासाठी गोंडी साहित्य सर्वात महत्वाची भूमिका पार पाडणार आहे, असे सांगीतले.राजमाता फुलवादेवी या मांझी सरकार सेनेच्या संचालिका असून दिल्ली येथील आंतरराष्टÑीय कार्यालयातून मांझी सेनेचे संचालन करतात. विदेशात त्यांची मांझी सरकार सेना जल, जंगल व जमिनीचे रक्षण करण्यासाठी सतत कार्य करीत आहे. नुकतेच राजमाता फुलवादेवी यांंनी कचारगडला (धनेगाव) भेट देवून मांझी सरकारच्या सैनिकांशी संपर्क केला. तसेच या भागात आदिवासींच्या विविध विषयांवर माहिती जाणून घेतली. या दरम्यान त्यांनी धनेगाव स्थित भाषा संशोधन केंद्राला भेट दिली व सुप्रसिद्ध लेखिका उषाकिरण आत्राम आणि त्यांचे पती गोंडवाना दर्शनचे संपादक सुन्हेरसिंह ताराम यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला.आदिवासींच्या बोलीभाषा, गोंडीभाषा, गोंडी शब्दकोष व इतर रचनेबद्दल चर्चा करीत ताराम दाम्प्त्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, गोंडी शब्दकोष हा अत्यंत महत्वाचा दस्तावेज तयार झाल्यामुळे गोंडीभाषा शिकायला व समजायला इतरांना मदत होईल. यावेळी फुलवादेवी यांंनी भाषा, संस्कृती, परंपरा व पारंपरिक ठेवा याबद्दल सुन्हेरसिंग ताराम आणि उषाकिरण आत्राम यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी त्यांचा मुलगा कुलदेव कांगे आणि मुलगी अॅड. राजकुमारी कांगे सोबत उपस्थित होते.१०५ वर्षांपूर्वी कंगला मांझी यांनी मांझी सेना गठित करुन जल, जंगल, जमीन व जीव वाचविण्याचा हेतूने मांझी सेवा सरकार चळवळ सुरू केली होती. पुढे फुलवादेवी यांनी ही चळवळ हाती घेतली व त्या चळवळीचे यशस्वी संचालन करीत आहेत.
साहित्यामुळे गोंडी संस्कृती जपणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:22 AM
बदलत्या काळानुसार गोंडी संस्कृतीचा अनेकांना विसर पडला आहे. त्यांचे वाईट परिणाम सुद्धा समाजाला भोगावे लागतात.
ठळक मुद्देराजमाता फुलवादेवी : धनेगाव येथील भाषा संशोधन केंद्राला भेट