तिरोडा : आज राजकीय, सामाजिक दृष्टीनेही समाज किती आहे व तो संघटित आहे का, याकडे लक्ष दिले जाते. एखादी जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा आमदाराकरिताही विशिष्ट समाजाच्या व्यक्तीला तिकीट द्या, असा बहुधा आग्रह असतो. त्यासाठी समाजाला संघटित ठेवणे काळाची गरज आहे, असे मत तेली समाजाचे महाराष्ट्र प्रांतिकचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष उमेंद्र भेलावे यांनी केले.
गोंदिया येथील डीप्लॅन प्लॉयवूड पार्कमध्ये विशेष सभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. कार्याध्यक्ष डी.आर. गिरीपुंजे, युवा आघाडी अध्यक्ष कमल हटवार, सेवा आघाडी अध्यक्ष हरीराम येळणे, सचिव मुकुंद धुर्वे, मुख्याध्यापक रामसागर धावडे, तिरोडा ग्रामीण अध्यक्ष राजेश कावळे, उमेश मलेवार, वा.आ.वंजारी, राहुल मदनकर, अशोक पडोळे, हरिश चिंधालोरे, आर.एन.धारपिंडे, कैलाश भेलावे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी कमल हटवार यांना युवा आघाडी अध्यक्ष तर सचिव राहुल मदनकर यांना नियुक्तिपत्र दिले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष डी.आर.गिरीपुंजे यांनी? समाजात एकता ठेवूनच प्रगती साधता येते, याकरिता विविध कार्यक्रम व उपक्रम घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले, तर हरिराम येळणे, कमल हटवार, राजेश कावळे यांनी? ही समाजाच्या प्रगतीसाठी विकासासाठी काय करता येऊ शकते, यावर प्रकाश टाकला. कार्यक़्रमाचे संचालन मुकुंद धुर्वे आभार प्रदर्शन कमल हटवार यांनी? केले. यशस्वितेसाठी समाजबांधवांनी मोलाचे सहकार्य केले.