सालेकसा : वर्तमान काळात समाजापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कोसो दूर राहिलेला आहे. इतिहासाच्या आधारे समाजाचे खरे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे आपला खरा इतिहास विशेष युवकांना व समाजाला करणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर वर्तमानातील समाजाने अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे कारण विकासात खरा अर्थ निर्माण करणारे आहे. त्यामुळे समाजातील लोकांनी जागृत होणं अत्यंत काळाची गरज आहे. महाराष्ट्र नवरत्नांचे राज्य आहे, त्यात जन्मलेले रत्न म्हणजे महामानव, त्यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकाने अंगीकारायला हवे असे प्रतिपादन जितेंद्र आसोले यांनी केले.
कुणबी महासंघ, महिला महासंघ सालेकसा व तालुक्यातील बहुजनांच्यावतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते. समाज एका संघाखाली कसा येईल यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने चिंतनात्मक कार्य करणे ही काळाची गरज असून प्रत्येकाने समाज उन्नतीसाठी कार्य करावे. समाज बळकट करण्यासाठी एकत्रित येऊन समाजाची ताकद दाखवणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर समाज विकासावर प्रत्येकाने समोर येणे काळाची गरज आहे असे वक्तव्य भरत बहेकार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरूषोत्तम मेंढे होते. यावेळी भुवनेश्वर शिवणकर,माजी जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, माजी पंचायत समिती सभापती सुनंदा बहेकार, जया डोये, टीना चुटे, प्रल्हाद वाढई, परसराम फुंडे, तुकाराम बोहरे, डॉ. भूषण फुंडे, राजेंद्र बागडे, अनिल फुंडे, वासुदेव फुंडे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे, संजय दोनोडे, राजू दोनोडे, मोरेश्वर फुंडे, नरेंद्र ब्रामणकर, वासुदेव चुटे, संतोष फुंडे, देवराम चुटे, मनोज डोये उपस्थित होते. यावेळी शोभायात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा धारण केलेल्या व्यक्तींना घोड्यावर बसवून संपूर्ण गावातून रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बारसे यांनी मांडले. संचालन बाजीराव तरोणे, नीलेश बोहरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संघटनेचे अध्यक्ष गिरजाशंकर मेंढे यांनी मानले. कार्यक्रमासाठी गौरीशंकर भंडारकर, भुवन मेंढे, शाम येटरे, महेश बागडे, जितेंद्र शेंडे, परमानंद शिवणकर, रवी चुटे, राजकुमार बहेकार, देवेंद्र बहेकार, राजेंद्र बहेकार, लखन बहेकार, सचिन बहेकार, खुशाल शिवणकर, चंद्रकुमार बहेकार, कृष्णा मेंढे, पवन पाथोडे, यशवंत शेंडे, राजू फुंडे यांनी सहकार्य केले.
....
रॅली ठरली आकर्षणाचे केंद्र
कुणबी महासंघाच्यावतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सालेकसा येथून भव्य रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेतील व्यक्तींना घोड्यावर बसवून रॅली काढण्यात आली. ती आकर्षणाचे केंद्र ठरली होती.