शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

इटियाडोह विकासाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:21 PM

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलाशय हे जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांपैकी एक महत्त्वाचे स्थळ म्हणून ओळखले जाते. या जलाशयाच्या चारही बाजूने हिरवागार शालू परिधान करुन उभ्या असलेल्या पर्वत रांगा आणि त्यामध्ये इटियाडोह जलाशयाची निर्मिती झाली आहे.

ठळक मुद्देसुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष : लोकसहभागातून श्रमदानाचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलाशय हे जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांपैकी एक महत्त्वाचे स्थळ म्हणून ओळखले जाते. या जलाशयाच्या चारही बाजूने हिरवागार शालू परिधान करुन उभ्या असलेल्या पर्वत रांगा आणि त्यामध्ये इटियाडोह जलाशयाची निर्मिती झाली आहे. हे पर्यटकांसाठी अत्यंत मनमोहक व आकर्षित करणारे स्थळ आहे. परंतु या स्थळाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक सोईसुविधांपासून हे स्थळ वंचित आहे.अनेकदा वर्तमानपत्रामधून येथील सोयीसुविधांच्या अभावाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यासाठी श्रीधर हटवार यांच्या नेतृत्वात या परिसरातील तरुण उत्साही मंडळी एकत्र येवून त्यांनी इटियाडोह परिसर विकास मंच स्थापन केला. तसेच दर रविवारी लोकसहभागातून श्रमदानाच्या माध्यमातून या परिसराचा विकास करण्याचा संकल्प करुन ठराव पारित करण्यात आला.या परिसराकडे शासनाचे पर्यायाने इटियाडोह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. नळ योजना बंद पडली आहे. विद्युत सुविधा नाही, विद्युत पोल आहेत, परंतु दिवे बंद आहेत. विश्रामगृहामधील फ्रीज बंद आहे. पर्यटकांसाठी हॉटेल व जेवणाची व्यवस्था नाही. वाहन पार्किंगची व्यवस्था नाही. येथील बगिचा सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या महत्वाच्या असुविधांमुळे पर्यटकांची गैरसोय व निराशा होत आहे.ही बाब लक्षात घेवून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी योगेश नाकाडे, चेतन दहीकर, श्रीधर हटवार यांच्या नेतृत्वात इटियाडोह जलाशय परिसर विकास मंच तयार करण्यात आला. लोकसहभागाच्या माध्यमातून श्रमदान करुन रविवार (दि.२४) पाणी विसर्ग मुख्य गेट ते ओवर फ्लोपर्यंतच्या पाळीवरील वाढलेल्या झाडझुडपांची कापणी करुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने राजे ग्रुप अर्जुनी-मोरगावसह योगेश नाकाडे, चेतन दहीकर, श्रीधर हटवार, सचिन फटींग, गुणवंत पेशने, सुनील बांते, आशीष डोंगरवार, प्रशांत डोंगरवार, मिथुन टेंभरे, हितेश हलमारे, लिलाधर निर्वाण, कांतीलाल डोंगरवार, सतीश शहारे, चंदू बोरकर, हर्ष हलमारे यांचा प्रामुख्याने सहभाग होता.या वेळी परिसरातील १०० कार्यकर्त्यांच्या उपस्थित स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. यानंतर शासनाची कोणतीही मदत न घेता स्वतंत्र निधी उभारुन अत्यंत आवश्यक असणारी कामे हाती घेवून पूर्ण करण्याचा संकल्प घेण्यात आल्याचे लोकमतला सांगण्यात आले.