लोकमत न्यूज नेटवर्कगोठणगाव : येथील इटियाडोह विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. देखभाल व दुरूस्ती करण्यासाठी निधी नसल्याने वाईट अवस्था होत असल्याची कबुली इडियाडोह सिंचन विभागातील अधिकाºयांनी दिली.मागील काही वर्षांपासून पाटबंधारे विभागाने विकास निधी उपलब्ध करुन दिला नाही. एवढेच नाही तर देखभाल दुरुस्तीची कामे कंत्राटी पद्धतीने दिली जातात. त्यामुळे संबंधित अधिकाºयांकडे कुठलीही सोर्स नसतो. पाटबंधारे विभागामार्फत छोटे-मोठी कामे केली जात व त्यातून विश्रामगृहातील समस्या सोडविली जात होती. तेव्हा विश्रामगृहाची स्थिती चकाचक असायची. विश्रामगृहाकडे जाणाºया रस्त्याच्या दोन्ही बाजूनी रंगीबेरंगी फुलांची झाडे होती. नोकर वर्ग भरपूर असायचा. विश्राम गृहाच्या उत्तर-दक्षिण भागात गुलाबाचे फूल डोलायचे, मनमोहक असे वातावरण राहायचा व त्यालाच पर्यटक मोहून जायचे. संबंधीत अधिकारी सुद्धा निष्ठेने काम करायचे.परंतु आजघडीला ते वैभव राहिले नाही. विभागाचे दुर्लक्ष व निधीची कमतरता यामुळे विश्रामगृहाची दैनावस्था झाली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी याकडे लक्ष देऊन केंद्रीय पाटबंधारे मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून द्यावे व इटियाडोह जलाशय पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावा. त्यामुळे परिसरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
इटियाडोह विश्रामगृहाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 10:06 PM
येथील इटियाडोह विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. देखभाल व दुरूस्ती करण्यासाठी निधी नसल्याने वाईट अवस्था होत असल्याची कबुली इडियाडोह सिंचन विभागातील अधिकाºयांनी दिली.
ठळक मुद्देनिधीचा अभाव : विभागाचेही विश्रामगृहाकडे दुर्लक्ष