लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे १० जून रोजी दुपारी १२ वाजतापासून कामगार भवन रामनगर, गोंदिया येथे जिल्हा मेळाव्याचे आयोजन केले आहे. यात ग्राम पंचायत, आंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार, अंशकालीन स्त्री परिचर, घर कामगार, बि डी कामगार, हमाल, पावर प्लांट, शेतमजूर, विद्युत कर्मचारी आणि संलग्न कामगार संघटनेचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मेळाव्याला आयटकचे राज्य अध्यक्ष सुकुमार दामले, राज्य महासचिव श्याम काले, राज्य सचिव शिवकुमार गणवीर मार्गदर्शन करणार आहेत. कामगाराचे प्रश्न, मागण्या, सरकारचे कामगार विरोधी धोरण, आयटकच्या नेतृत्वात सुरू आंदोलन व कामगारांना मिळालेले अधिकार इत्यादी विषयावर आयटकचे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. अदानी पावर प्लांटमधील कामगाराचे शोषण, कामगार कायद्याची होत असलेली पायमल्ली मजुरावर दडपशाही करुन कामगार कायद्यापासून वंचीत करण्याचे धोरण ठरविण्यात येतील. या मेळाव्यात संलग्न युनियनच्या प्रतिनिधीनी सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, रामचंद्र पाटील, करुणा गणविर, विवेक काकडे, शेखर कनोजिया, शालू कुथे यांनी केले.
गोंदियात आयटकचा जिल्हा मेळावा आज
By admin | Published: June 10, 2017 2:08 AM