आमगाव : मोनटेक्स बॉल क्रिकेट असोसिएशन गोंदिया व महाराष्ट्र राज्य मोनटेक्स बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद मोनटेक्स बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप २०२०-२१ चे आयोजन १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान भवभूती महाविद्यालय,आमगाव येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत सीनियर मुले या गटात जालना प्रथम क्रमांक जालना, ज्युनियर मुले गटात गोंदिया प्रथम क्रमांक पटाकाविला. या स्पर्धेत महाराष्ट्रातून एकूण १५ जिल्हा संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष म्हणून आ. सहषराम कोरोटे, राज्य सचिव दुलीचंद मेश्राम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय बहेकार, महेश उके, उज्जवल बैस, अजय खेतान, रामेश्वर श्यामकुवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेता सर्व संघाना पदक, चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विजेत्या संघामध्ये सीनियर मुले प्रथम जालना, द्वितीय नागपूर, तृतीय जळगाव, गोंदिया, ज्युनियर मुले प्रथम गोंदिया, व्दितीय नागपूर, तृतीय भंडारा. सीनियर मुली प्रथम गोंदिया, व्दितीय भंडारा, ज्युनियर मुली प्रथम गोंदिया, व्दितीय बुलडाणा या संघाने मिळविला. या स्पर्धेतून गाझियाबाद, उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या १० व्या फेडेरेशन चषक राष्ट्रीय मोनटेक्स बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप २०२०-२१ करिता राज्य संघाची निवड करण्यात आली. संयोजक नरेश बोहरे, अमित मेश्राम, आकाश पटले, शारुख पठाण, दुर्गाप्रसाद मेश्राम, अर्जुन पटले, ओमकार नागफासे, गावीत कोसरकर, कपिल कोल्हटकर, निखिल डोंगरे, ओमेश्वर तांडेकर, गोल्डी भाटिया, स्वप्निल ठाकरे, पुरुषोत्तम बागडे, प्रियंका राऊत, भारती चचाणे, कुसुम पटले, आकांक्षा सोनुले यांनी सहकार्य केले.
राज्यस्तरीय मोनटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेत जालना विजयी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:45 AM