शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीसह देशातील सर्व CRPF शाळांमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, पोलिसांनी सुरक्षा वाढवली
2
नवी मुंबईत भाजपाला धक्का! तिकीट नाकारताच संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
3
60 वर्षांचे झाले अमित शाह; किती आहे त्यांची नेटवर्थ अन् कोणकोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक? जाणून घ्या
4
"४८ तासांत रोख रक्कम..."; सुकेश चंद्रशेखरची करण जोहरला मोठी ऑफर, जॅकलिनचंही घेतलं नाव
5
"माझ्याविरोधात मोदी, शाहांच्या सभा घ्या, मला आघाडी वाढवायला मदत होईल’’, रोहित पवारांचा टोला 
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निलेश राणेंचं ठरलं! धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढणार
7
७ लाख रुपयांचा जीवन विमा तीन वर्षांसाठी मिळेल मोफत; EPFO ​​ने १२ महिने सतत सेवेची अटही हटवली
8
Paytm Q2 Result : पेटीएमला झाला ९३० कोटी रुपयांचा नफा; तरी का ८% आपटले शेअर्स? कारण काय? 
9
निवडणुकीपूर्वी अजित पवारांना 'सुप्रीम' दिलासा; घड्याळ चिन्हाबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! 
10
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी Team India ची घोषणा; ऋतुराज गायकवाड कर्णधार, किशनचीही एन्ट्री
11
Gold Silver Rates Today : सोन्याची किंमत नव्या शिखरावर, चांदीही लाखाच्या पार; खरेदीपूर्वी पाहा १८ ते२४ कॅरेट सोन्याचे दर
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : " सापडलेल्या पाच कोटी प्रकरणी संजय राऊतांची चौकशी व्हावी,", अजितदादांच्या नेत्याने केली मागणी
13
इनोव्हामध्ये ५ कोटींची रोकड सापडली, पण कारमालकाने केला वेगळाच दावा; जबाबदारी झटकत म्हणाला...
14
आचारसंहितेचं उल्लंघन होतंय; मग करा 'सी-व्हिजिल एप'वर तक्रार!
15
ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, इमारत कोसळली, ९ कर्मचारी गंभीर जखमी 
16
"मी यापुढे कधाही.."; प्रभासला 'जोकर' म्हणाल्यानंतर ट्रोल झालेल्या अर्शद वारसीचं मोठं विधान, म्हणाला-
17
महागाईचा सामना करण्यासाठी सरकारला अंबानींची साथ; Reliance Retailमध्ये मिळणार स्वस्त डाळ, तांदूळ?
18
जळगावमधील उद्धव सेनेचे इच्छुक मुंबईत ठाण मांडून, मविआच्या जागांचा फैसला होईना...
19
माझ्या बापाविषयी बोलाल तर खबरदार, तुमचे काय वाईट केले: जयश्री थोरात यांचा पलटवार
20
मॉडेलिंगचं स्वप्न, १५ वर्षे मोठ्या अधिकाऱ्यासोबत लग्न, घटस्फोटानंतरही राहत होते एकत्र, आता सापडला तरुणीचा मृतदेह  

कृषी योजनांचा जनजागृती सप्ताह

By admin | Published: July 05, 2015 1:56 AM

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने तालुक्यात १ ते ७ जुलैपर्यंत कृषी जागृती सप्ताह राबविण्यात येत आहे.

बोंडगावदेवी : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने तालुक्यात १ ते ७ जुलैपर्यंत कृषी जागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचा शुभारंभ तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी नंदकुमार मुनेश्वर, कृषी पर्यवेक्षक ऋषी चांदेवार, प्रगतीशील शेतकरी कृष्णा शहारे, कुषण झोळे यांच्या उपस्थितीत स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करुन अभिवादन करुन करण्यात आला.सप्ताहानिमित्त तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषीविषयक तंत्रशुद्ध माहिती तसेच कृषी विभागाच्या असलेल्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकास व्हावा यासाठी गावो-गावी शेतकऱ्यांसाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांच्या नेतृत्वाखाली मंडळ निरीक्षक नंदकुमार मुनेश्वर, पर्यवेक्षक आर.के. चांदेवार, एम.बी. ठाकूर, बी.टी. राऊत, बी.एस. हिंगे, कृषी सहायक डी.एम. शहारे, आर.एच. मेश्राम, एन.एन. बोरकर, एस.एन. बोचरे, ए.आर. हुकरे, आर.एन. रहांगडाले, पी.बी. वासनिक, एम.डी. कठाणे, आर.एच. भडके, पी.के. खोटेले, व्ही.आर. औरासे, एफ.एम. कापगते, ए.व्ही. कुथे, बी.पी. डोंगरवार, बी.एन. येरणे, पी.बी. काळे, एस.एफ. ठवकर, एम.टी. येळणे यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक तंत्रशुद्ध माहिती दिली.२ जुलै रोजी मोरगाव, माहुरकुडा, महागाव, वडेगाव/रेल्वे, झरपडा, सिलेझरी, सिरेगावबांध, पवनी धाबे, केशोरी, झाशीनगर, परसटोला, बाराभाटी, नवेगावबांध, देवलगाव, भिवखिडकी , गोठणगाव, चान्ना, प्रतापगड, महालगाव, बोळदे, डोंगरगाव, ताडगाव, सिरोली, नवनितपूर, गुढरी, धाबेटेकडी/पवनी, कन्हेरी, चुटीया, बाक्टी, रामनगर, ३ जुलै रोजी तावशी, बोरी, मालकनपुर, वडेगावबंध्या, कन्हाळगाव, इंझोरी, धाबेटेकडी, जांभळी, गार्डनपूर, तिडका, धमदीटोला, सुकळी, परसोडी (रै.), कवठा, बीडटोला, सुरबन, येरंडी/देवी, तिडका, घुसोबाटोला, मांडोखाल, बुधेवाडा, सोमलपूर येथे बैठक घेण्यात आली. ४ जुलै रोजी खोळदा, सावरी, रामपूरी, दिनकरनगर, इटखेडा, आसोली, जब्बारखेडा, गवर्रा, जुनेवानी येथे घेण्यात आला. तर ५ जुलै रोजी करांडली, जरुघाटा, निमगाव, बोंडगावदेवी, ईसापूर, कोरंभीटोला, पिंपळगाव, माहुली, डोंगरगाव, भरनोली, खामखुर्रा, कोरंभी, खांबी, चापटी, दाभना, कोहलगाव, उमरपायली, राजोली, पुष्पनगर,/ब., ६ जुलै रोजी विहिरगाव, बोरटोला, अरततोंडी, गौरनगर, येगाव, कान्होली, वारव्ही, सायगाव, देऊळगाव/बोदरा, साकरटोला, अरुणनगर, जानवा, रांजीटोला, अंभोरा. ७ जुलै रोजी आसोली, सुरगाव, सोनेगाव, बोदरा, डोंगरगाव, खडकी या ठिकाणी बैठका घेवून तालुक्यातील कृषी अधिकारी शेतकऱ्यांना विशेष मोलाचे मार्गदर्शन करणार आहे. दरम्यान दुपारी ३ वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी जागृती सप्ताहाची सांगता तालुका कृषी अधिकारी तुमडाम, मंडळ अधिकारी मुनेश्वर, कृषी पर्यवक्षेक चांदेवार, शहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. (वार्ताहर)