सिरोली येथे एकूण क्षेत्राच्या ६० टक्के क्षेत्रात भातशेती रोवणी केली जाते. गावाचे भात पिकाखालील क्षेत्र २७५ हेक्टर आहे. ६० टक्के क्षेत्रावर जपानी पद्धतीने भात शेती लागवड केली आहे. इटियाडोह प्रकल्पाच्या सिंचनाचा लाभ घेऊन परिसरातील शेतकरी समृद्ध होत आहे. जपानी पद्धतीने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नीताराम मस्के, प्रदीप मस्के,अनिल मस्के,रमेश मस्के या शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनात परिसरातील शेतकरी आता जपानी पद्धतीने भात पीक लागवड करू लागले आहेत. जपानी पद्धतीने भात शेती केल्यामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. शेतकऱ्यांना कीटकनाशके फवारणी व खते देणे या पद्धतीने सोपे जाते. फुटव्यांची संख्या जास्त आल्याने पारंपरिक भात पीक लागवड पेक्षा उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो. तालुक्यातील शेतकऱ्यांनी जपानी भात पीक पद्धतीचा वापर करावा. नवनवीन प्रयोग, विकसित व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन कृषी सहायक यशवंत कुंभरे यांनी केले आहे.
220921\59522028-img-20210922-wa0011.jpg
जपानी पध्दतीने भातशेती लागवडीचे मार्गदर्शन करताना कुंभरे