लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात रब्बी आणि उन्हाळी धानासाठी सध्या कालव्याव्दारे पाणी सोडले जात आहे. याच अंतर्गत गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला पाणी सोडण्यात आले असून बबई येथील २ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाणी नेण्यासाठी जेसीबीव्दारे कालवा फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. मात्र या प्रकाराकडे कलपाथरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.रब्बी हंगामातील हलक्या धानाची कापणी सध्या सुरु आहे. तर काही शेतकऱ्यांनी जड प्रतीचा धान लावला असून त्याला एका पाण्याची गरज आहे. यासाठी गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी प्रकल्पाचे पाणी मुख्य कालव्याव्दारे सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या धान पिकासासाठीच हे पाणी सोडण्यात आले असून त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचण्याची व्यवस्था करुन देण्यात आली आहे.मात्र कलपाथरी मुख्य कालव्या अंतर्गत शेती असणाऱ्या ग्राम बबई येथील २ शेतकऱ्यांनी आपल्या शेतापर्यंत पाणी नेण्यासाठी चक्क जेसीबीने कालवा फोडून कालव्यातील पाणी नेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या २ शेतकऱ्यांनी कालव्याला जेसीबीव्दारे मोठी खांड पाडली आहे. हे सर्व करीत असताना संबंधित शेतकऱ्यांनी यासाठी कलपाथरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे. दरम्यान प्रकारामुळे इतर शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने त्यांनी याला विरोध केला. तसेच याची तक्रार सुध्दा संबंधित विभागाकडे केली आहे. मात्र संबंधित विभागाने याची अद्यापही दखल घेतली नाही. मात्र अन्य शेतकऱ्यांचे पाण्याअभावी धोक्यात आल्याने शेतकºयांमध्ये अधिकाºयांच्या कर्तव्य तत्परतेप्रती संतापाचे वातावरण आहे.कलपाथरी प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकºयांचे होणारे नुकसान टाळावे तसेच नियमबाह्यपणे कालवा फोडणाऱ्या २ शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जेसीबीने कालवा फोडून वळविले जात आहे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 5:00 AM
रब्बी हंगामातील हलक्या धानाची कापणी सध्या सुरु आहे. तर काही शेतकऱ्यांनी जड प्रतीचा धान लावला असून त्याला एका पाण्याची गरज आहे. यासाठी गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी प्रकल्पाचे पाणी मुख्य कालव्याव्दारे सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या धान पिकासासाठीच हे पाणी सोडण्यात आले असून त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचण्याची व्यवस्था करुन देण्यात आली आहे.
ठळक मुद्देबबई येथील प्रकार : कलपाथरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांचा आरोप