दुर्वेश सोनवाने : स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा सत्कार समारंभआमगाव- आमगावसारख्या स्थळी अलिप्त असलेल्या स्वातंत्र संग्राम सेनानींबद्दल आदर बाळगणे व त्यांना नमन करण्याचे जेसीआयचे हे कार्य जीवनाला दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी केले. जेसीआयच्यावतीने रविवारी परिसरातील स्वतंत्र संग्राम सेनानींचा सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अजय देवरे, तहसिलदार राजीव शक्करवार, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती टिकाराम मेंढे, प्राचार्य वसंत मेश्राम, जेसीचे वासुदेव रामटेक्कर, हर्ष अग्रवाल, रवि अग्रवाल, प्रा. कमलबापू बहेकार, जयश्री पुंडकर, संतोष पुंडकर, रवि क्षिरसागर उपस्थित होते. पुढे बोलताना सोनवाने यांनी, विद्यार्थ्यांना मेहनत, जिद्द व व्यापक दृष्टीकोन ठेऊन जिवनाची वाटचाल करावी असा सल्ला दिला. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरे यांनी, आजच्या शैक्षणिक पद्धतीत काळानुरूप सुधारणा व्हावी. धैर्यवान, गुणवंत व किमान कौशल्यावर आधारीत विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक, पालक व समाजाने जागृत रहावे असे आवाहन केले. तर म्हाडाचे माजी सभापती माहेश्वरी यांनी, जेसीआयच्या उपक्रमाची प्रशंसा करीत यापुढेही गरजवंतांना मदत होईल असे उपक्रम घेत रहावे अशी आशा व्यक्त केली. दरम्यान, कस्तुरीदेवी अग्रवाल, सेवानिवृत्त भारतीय सैनिक मटाले, आसाराम तुमसरे यांचा पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे निमित्त साधून विद्यार्थ्यांची देशभक्ती गीत स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये आदर्श विद्यालय, विद्या निकेतन, विद्या निकेतन कॉन्व्हेंट, भवभूती महाविद्यालय, पंचशिल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, हरिहरभाई पटेल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, विवेक मंदिर गोंदिया, के.के.कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धांचे परिक्षक म्हणून प्रतिभा घोडे व सेवा निवृत्त नायब तहसिलदार जगदीश बडवाईक उपस्थित होते. दरम्यान पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य मेश्राम यांनी केले. आभार संतोष पुंडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य के.डी.धनोले, प्रा.एच.बी.मेंढे, संतोष नागपुरे, डॉ. हेमंत फुंडे, डॉ. टी.डी.कटरे, राजीव वंजारी, शोभेलाल कटरे, प्राचार्य डी.एम.टेंभरे, अजय खेतान, भोला गुप्ता, रवि क्षिरसागर यांनी सहकार्य. (शहर प्रतिनिधी)
जेसीआयचे कार्य जीवनाला दिशा देणारे
By admin | Published: August 26, 2014 12:05 AM