शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
2
टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
4
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
5
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
6
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
7
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
8
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
9
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
10
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
11
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
12
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
13
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
14
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
15
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
16
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
17
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
18
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
19
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी

आदिवासी विद्यार्थ्यांची थट्टा

By admin | Published: January 17, 2015 11:01 PM

आदिवासी युवक-युवतीकरिता रोजगार व स्वयंरोजगार देण्याच्या उद्देशाने सरकारद्वारे बऱ्याच वर्षापासून देवरी येथे सुरू असलेल्या रोजगार व स्वयंरोजगार केंद्राकडून आदिवासी

सुशील जैन - देवरीआदिवासी युवक-युवतीकरिता रोजगार व स्वयंरोजगार देण्याच्या उद्देशाने सरकारद्वारे बऱ्याच वर्षापासून देवरी येथे सुरू असलेल्या रोजगार व स्वयंरोजगार केंद्राकडून आदिवासी विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. आ.संजय पुराम यांच्या आकस्मित भेटीत हा प्रकार उघडकीस आला.आदिवासी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी ४० विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग या केंद्राद्वारे चालविले जातात. शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रतिमाह एक हजार रुपये विद्यावेतन देण्याची तरतूद आहे. परंतु मागील पाच महिन्यांपासून विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात आले नाही. येथे विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान व बुद्धीमत्ता हे चार विषयांचे शिकवणी वर्ग शिकविले जातात. हे विषय शिकविणाऱ्या अध्यापकांनासुद्धा आॅगस्ट २०१४ पासून पगार देण्यात आले नाही. या कार्यालयात आठ कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. परंतु अधिकांश वेळेत केवळ चपराशीच येथे हजर असतो. याबाबतच्या तक्रारी कळताच आ. संजय पुराम यांनी १५ जानेवारीला दीड वाजता या कार्यालयात आकस्मिक भेट दिली. त्या वेळेस एकही विद्यार्थी हजर नव्हता. कार्यालय अधिकारी व एक चपराशी फक्त येथे हजर होते. आमदारांनी भेट पुस्तिका मागितली असता ती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना पाच महिन्यांपासून विद्यावेतन देण्यात आले नाही. तसेच शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांना सुद्धा मागील पाच महिन्यांपासून मानधन देण्यात आले नसल्याचे आढळले. आदिवासी विद्यार्थ्यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षेची पुस्तके येथे उपलब्ध नाहीत. तसेच तज्ज्ञ शिक्षकांचा अभाव असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याचे विद्यार्थ्यांनी बोलून दाखविले. विशेष म्हणजे या कार्यालयावर नियंत्रण ठेवण्याकरिता जिल्हा पातळीवर या विभागाचे कार्यालय नाही. विभागीय कार्यालय नागपूर येथे असल्याने या कार्यालयावर कोणत्याही अधिकाऱ्यांचे वचक नाही. येथे कार्यरत असलेले अधिकारी बी.एच. डोंगरे हे येत्या ३१ जानेवारीला सेवानिवृत्त होत असल्याचे त्याचे सुद्धा या कार्यालयाकडे दुर्लक्ष आहे. वरीष्ठ अधिकारी इकडे भटकत नसल्याचे कर्मचारी येथे हजर राहत नसल्याचे उघडकीस आले आहे. फक्त एका चपराशाच्या भरवश्यावर हे कार्यालय चालत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. आमदारांनी कार्यालय अधिकारी डोंगरे यांची चांगलीच कानउघाडणी केली व नंतर प्रभारी उपसंचालक डी.एम. गोस्वामी नागपूर यांच्याश्ी दुरध्वनीवर बोलून या कार्यालयातील गौडबंगालाची माहिती देऊन त्वरित कार्यालयाला भेट देण्याची सूचना केली.यापूर्वी २०१० मध्ये उपसंचालक मेंडके यांनी या कार्यालयाला एकदा भेट देऊन वर्षभरात तीन भेटी दाखविल्याचे मस्टर पाहिल्यावर समजून आले. विभागीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील रोजगार व स्वयंरोजगार केंद्रावर आदिवासी युवक-युवतींना पाहिजे तसे ज्ञान प्राप्त होत नसून रोजागाराच्या नावावर आदिवासीची थट्टा या कार्यालयाकडून होताना दिसून येत आहे.