लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूरबांध : सीमा तपासणी नाका तयार होवून तीन वर्षांचा काळ लोटला. मात्र या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा काम झाले आहे. त्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या हजारो वाहन चालकांना त्रास सोसावा लागत आहे. या सीमा तपासणी नाक्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहन काढणे चालकांसाठी कठीण झाले आहे.या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. शिवाय कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडू शकतो. सीमा तपासणी नाक्यावर बीओटी तत्वावर सेवा देत असलेल्या सद्भाव कंपनीचा फक्त माल येवो, हाच सिद्धांत सुरू आहे. सदर कंपनीमार्फत वाहनांकडून सेवा शुल्क आकारण्यात येते. परंतु सेवा देण्याचा विषय बाजूला सारुन फक्त सेवा खाण्याचा प्रकार सर्रास सुरु आहे. या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये माती व मुरुम टाकून बुजविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु सध्या पावसाळा सुरु असल्याने माती, मुरुम वाहून जात आहे. या ठिकाणी पडलेले खड्डे तात्काळ सिमेंट कांक्रीट घालून बुजविण्याची मागणी जनतेकडून होत आहे.
सीमा तपासणी नाक्यावर जीवघेणे खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 10:17 PM