१३ गुन्हे दाखल : दोन लाखांचा माल जप्त गोंदिया : जिल्हाभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध हातभट्ट्या, मोहा दारू विक्रेते व देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर राबविलेल्या धाडसत्रात एकाच दिवशी १३ गुन्हे नोंदवून १.९४ लाखांचा माल जप्त केला. प्राप्त माहितीनुसार दि.१४ ला ही विशेष मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान ४ आरोपींना महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. या मोहिमेत १०२ लिटर हातभट्टीची दारू, मोहा सडवा ९२०० लिटर आणि हातभट्टीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा १ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक केलेल्या आरोपींमध्ये सावन रूद्रेश गराडे, रा.पांढराबोडी, दिनेश दुर्जन देवाधारी रा.भाद्याटोला ता.तिरोडा, भाऊलाल काशीराम पटले रा.बर्सी रा.तिरोडा, संगीता टेंभेकर रा.वडेगाव ता.तिरोडा यांचा समावेश आहे. ९ ठिकाणच्या कारवायांमध्ये आरोपी हाती लागले नाही. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथक नागपूरचे निरीक्षक जानराव, गोंदिया भरारी पथकाचे निरीक्षक एस.एम.राऊत, गोंदिया ग्रामीणचे दुय्यक निरीक्षक बी.जी. भगत, शहरचे दु.निरीक्षक आर.के.निकुंभ, देवरीचे दु.निरीक्षक एम.पी.चिटमटवार, एस.एल. बोडेवार, स.दु.निरीक्षक हुमे व रहांगडाले, मेश्राम तसेच जवान सिंधपुरे, हरिणखेडे, पागोटे, कांबळे, मुनेश्वर, ढोमणे, तऱ्हाटे, ढाले, उईके वाहनचालक सोनबर्से, मडावी व नागरे आदींनी केली.(जिल्हा प्रतिनिधी)
दारूभट्ट्यांवर धाडसत्र
By admin | Published: February 16, 2017 12:43 AM