शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
3
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
4
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
5
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
6
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
7
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
8
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
9
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
10
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
11
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
12
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
13
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
14
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
15
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
16
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
17
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
18
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
19
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
20
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी

विद्यार्थिनींवर आंबटशौकीनांचे जाळे

By admin | Published: January 17, 2016 1:37 AM

प्रौगंडावस्थेतील विद्यार्थिनींना विविध प्रकारचे आमिष देत त्यांचे लैगिंक शोषण करणाऱ्या युवक व पुरूषांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे.

गोंदिया : प्रौगंडावस्थेतील विद्यार्थिनींना विविध प्रकारचे आमिष देत त्यांचे लैगिंक शोषण करणाऱ्या युवक व पुरूषांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे. यात पौगंडावस्थेतील मुलींना लक्ष्य करून त्यांना जाळ्यात ओढले जात आहे. प्रेमाच्या भुलथापा देत त्यांचे लैंगिक शोषण केल्यानंतर त्यांना लग्नाचे आमिष देत दुसऱ्या राज्यात विक्री करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. ४० ते ५५ वर्षे वयोगटातील इसम लोक आपली वासना शमविण्यासाठी विद्यार्थिनींना टार्गेट करीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. विद्यार्थिनींना विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांना वस्तूरूपी भेट देतात. त्यांना नातेसंबंध सांगून विद्यार्थिनींशी जवळीकता साधतात. या जवळीकतेचा गैरफायदा घेत त्या मुलींना आपल्या जाळ्यात अडकल्या की, त्यांचे लैगिंक शोषण केले जात आहे. या टोळीच्या जाळ्यात अडकलेल्या मुलींना नंतर वारंवार ब्लॅकमेल करून त्यांचे नियमित शोषण केल्या जात आहे. फसलेल्या मुलींच्या माध्यमातून इतर मुलींही या साखळीत अडकत चालल्या आहेत.या आंबटशौकीनांच्या कचाट्यात जी मुलगी सापडली तिच्या मदतीने इतर मुलींना अडकविण्याचा प्रयत्न सुरू असतो. या टोळीत काम करणाऱ्या पुरूषांनी आपले छुपे डेरे शाळेसमोर, हॉटेल, बसस्थानक, मंदिर, रेल्वेस्थानक, बाजार परिसर, शिकवणी वर्गाबाहेर, बाग, क्रीडांगण येथे टाकले आहे. ५० वर्षांवरील वयाचे पुरूष या टोळीत अधिक संख्येने असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हल्ली मुलांना घरातून मिळणारी सूट, पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण व वारंवार होत असलेल्या विभत्स प्रदर्शनामुळे काही वयस्कर व्यक्तीदेखील नितिमत्ता सोडून अनैतिकतेच्या मार्गावर चालले आहेत. त्याचा अतिरेक होऊन नातेसंबंधात देखील अनैतिकता पसरविण्याचे काम समाजकंटक करीत आहेत. हा प्रकार अनेकांच्या लक्षात येत असला तरी ती मुलगी दुसऱ्याची असल्याने मला काय घेणे-देणे असा विचार अनेकजण करतात. आपली मुलगी दुसऱ्या कुणासोबत जाताना तिसरा शांत बसण्याच्या या प्रवृत्तीमुळे पालकांसाठी हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाला आहे. याच प्रकारातून जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढत आहेत. मात्र पोलीस विभाग त्याकडे गांभिर्याने पाहण्यास तयार नाही. (तालुका प्रतिनिधी)दप्तरात पुस्तकासोबत श्रृंगार साहित्यआंबटशौकीनांच्या कचाट्यात जाणाऱ्या विद्यार्थिनींनी शाळेत जाताना आपल्या शाळेच्या दप्तरात श्रृंगार साहित्य ठेवणे सुरू केले आहे. महाविद्यालयात आरसा, कंगवा, पावडर, फेस क्रिम व इतर श्रृंगारसाहित्य वापरले जाते. शाळेच्या मधल्या सुटीत हातपाय धुतल्यावर नटून-थटून त्या इसमांना भेटण्यासाठी शाळेच्या वेळातही जातात. शिक्षकांना विविध कारणे सांगून शाळेला बुट्टी मारण्याचा प्रकारही त्या विद्यार्थिनी करीत आहे.स्कार्फ बांधून वाहनांवर फेरफटकाया टोळीतील इसमांसोबत फिरायला जाताना मुली आपली ओळख नातेवाईकांना, गावकऱ्यांना किंवा पालकांना होऊ नये, यासाठी तोंडावर स्कार्फ बांधून दिवसा व संध्याकाळीदेखील फिरत असतात. तोंडाला कापड बांधून घरच्या लोकांसमोरूनही ती तरुणी वाहनाने गेली तरी तिच्या घरचे लोक तिला ओळखू शकत नाही. चेहऱ्यावर कापड बांधने आजची फॅशन झाली असली तरी या फॅशनचा गैरवापर होत असल्याची माहिती आहे.