नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पर्यावरण आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी सर्वत्र व्यापक स्वरुपात उपाययोजना राबविल्या जात आहेत.परंतु गोरेगावचा वनविभाग काळविटांचे अधिवास संपविण्यासाठी कुरण नष्ट करीत आहे. तालुक्याच्या चिल्हाटी ते गिधाडी दरम्यान असलेल्या ७५ हेक्टर जमीनीपैकी केवळ ५ हेक्टर जमीन कुरणासाठी ठेवण्यात आली. उर्वरित जागेवर रोपटी लावल्याने काळविटांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.गोंदिया जिल्ह्यातील तीन तालुक्यात काळविटांची संख्या वाढत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. आमगाव, गोंदिया व गोरेगाव या तीन तालुक्यातील जंगल परिसरात काळविटांची संख्या १५० पेक्षा अधिक आहे. मानेगाव येथे काळवीट व चितळांची संख्या बºयाच प्रमाणात आहे. राज्यात अकोला, अहमदनगर, अमरावती, नागपूर व गोंदिया येथे काळविटांची संख्या बºयाच प्रमाणात आहे. येथील माळरानात काळविटांचे मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. मात्र जिल्ह्यातील माळरान नष्ट होत असल्याने मोठ्या संख्येने असलेल्या काळविटांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या कमी होत आहे. सन २००४-०५ यावर्षी गोंदिया जिल्ह्यात काळविटांची संख्या २० ते २५ च्या दरम्यान होती. परंतु, ती संख्या आता १५० ते १८० च्या घरात गेली आहे. गोरेगाव तालुक्यातील गिधाडी येथील काळविटांचे अधिवास नष्ट करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गिधाडी येथील ७५ हेक्टर कुरण असलेल्या ७० हेक्टर जागेवर वनविभागाने रोपटे लावले आहेत. ४ कोटीवृक्ष लागवडीचे उद्दिष्टे गाठण्यासाठी वनविभाग वन्यजीवांची पर्वा न करता रोपटी लावत आहे. ७५ हेक्टर पैकी फक्त ५ हेक्टर क्षेत्र कुरणासाठी शिल्लक ठेवले आहे. ५६ च्या घरात असलेल्या काळविटांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कारण पोट भरण्यासाठी त्यांना या कुरणाचाच आधार आहे.काळविटांचे संवर्धन कुरणावर होते. केवळ ५ हेक्टर कुरणावर ५६ काळविटांचे संवर्धन करणे शक्य आहे का? याचे उत्तर वनविभागाने द्यावे. काळविटांच्या सानिध्यात विदेशी पक्षीही येतात. परंतु त्यांचे अधिवास नष्ट होत असतील तर त्यांचे संवर्धन कसे होणार? याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.अनिलकुमार नायरव्यवस्थापक वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया.या ठिकाणी ५ हेक्टर जमीन कुरणासाठी ठेवण्यात आली आहे. आता आम्ही १३.५६ हेक्टर जागेवर ३३ हजार ९०० रोपटे लावले आहेत. परंतु काळविट ९४० हेक्टर जंगलातही संचार करू शकतात.एस.एम. जाधववनपरीक्षेत्राधिकारी गोरेगाव.कसा ठेवणार वॉच ?काळविटांसह कुरणावर वावरणाºया लांडगे, चितळ, लांडगे, निलगाय यासारखे प्राणी या जंगलात वावरतात. काळविटांचे निरीक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी वॉच टॉवर तयार करण्यात आले. परंतु,त्या वॉच टॉवरच्या समोरच रोपट्यांची लागवड करण्यात आल्याने काळविटांवर वॉच कसे ठेवले जाईल हा प्रश्न आहे.
काळविटांसाठी कर्दनकाळ ठरतोय वनविभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 12:58 AM
पर्यावरण आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी सर्वत्र व्यापक स्वरुपात उपाययोजना राबविल्या जात आहेत.
ठळक मुद्देगिधाडी येथील अधिवास संपुष्टात: ७० हेक्टरमधील कुरण संपविले