शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जिल्ह्यात कलाम यांना भावपूर्ण सलाम

By admin | Published: July 30, 2015 1:40 AM

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक, देशाचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन व अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेले भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी निधन झाले.

गोंदिया : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक, देशाचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन व अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेले भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी निधन झाले. त्यांचे एकाएकी जाणे अनेकांना चटका लावून गेले. त्यांना जिल्हयात ठिकठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उमादेवी शिक्षण संस्थागोंदिया : सदर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट, प्रोग्रेसिव्ह इंग्रजी शाळा, आयसीएसई, मराठी, हिंदी, कनिष्ठ महाविद्यालय, प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयाद्वारे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, प्राचार्य प्रशासकीय अधिकारी, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे योगदान व उपलब्धी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.मनोहरभाई पटेल महाविद्यालयसडक-अर्जुनी : मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम शिलांग येथील इंडियन इंस्टिट्युट आॅफ मॅनेजमेंटमध्ये व्याख्यान देत असताना हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. त्यांना सडक-अर्जुनी येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात प्राचार्य डॉ. आलोक द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. संचालन प्रा. ए.एम. पाटील यांनी केले. या वेळी शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्कार हायस्कूलगोंदिया : संस्कार हायस्कूलमध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी शाळा अध्यक्ष मधू बंसोड, मुख्याध्यापिका सिंधू धोटे, जयश्री फुले, नलिनी चव्हाण, वर्षा कोहळे, राखी पुंजे, शीतल शहारे, सुचिता सोनवाने, शिल्पा अग्रवाल, शिल्पा मेश्राम, निशा शर्मा, भाग्यशाली कठाणे, अनिता चोरनेले, वर्षा बिसेन, वर्षा चव्हाण, विजया उके, सृष्टी अग्रवाल, कल्याणी बागडे, ज्योती सारंगपुरे, किरण वसंतानी व विद्यार्थी उपस्थित होते.युवा सेनागोंदिया : शिवसेना, युवा सेना व भारतीय विद्यार्थी सनेने नेहरू चौकात शोकसभा घेवून भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी प्रामुख्याने माजी आ. रमेश कुथे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे, भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रशांत ठवकर, युवा सेनेचे समिर आरेकर, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक प्रशांत कोरे, पुरूषोत्तम ठाकरे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तेजराम मोरघडे, सुनील लांजेवार, शहरप्रमुख विक्रमसिंह बैस, दीपकम बोबडे, विनोद तामसेटवार, चुन्नी चौरावार, प्रीतम लिल्हारे, कमलेश बनकर, हिमांशू कुथे, प्रशांत गणवीर आदी शिवसेना व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कालीमाटीकालीमाटी : येथील हनुमान मंदिराच्या सभामंडपात भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भागवत बहेकार, गजानन भुते, सेवा सहकारी संस्थेचे सदस्य राजू फुंडे, अध्यक्ष बंडू दोनोडे, शंकर रहांगडाले, मारूती फुंडे, यवकराम फुंडे, बाबू शेंडे, टीकाराम मेंढे, शंकर मुनेश्वर, हेमराज गिऱ्हेपुंजे, भोजू गिऱ्हेपुंजे उपस्थित होते. याप्रसंगी माजी राष्ट्रपती कलाम यांच्या छायाचित्रावर माल्यार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या विचारांना युवा पिढीने अंगीकृत करावे, असे मत फुंडे यांनी व्यक्त केले. संचालन हेमंत शेंडे यांनी तर आभार भास्कर पटले यांनी मानले.लोककला संस्थाबाराभाटी : येथील लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशिय संस्था येरंडी/बाराभाटीद्वारा देशाचे माजी राष्ट्रापती, भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम आणि आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते रा.सू. गवई यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम.आर. नंदागवळी, उपाध्यक्ष गुरूदेव रामटेके, सचिव चंद्रगुणी तिरपुडे, संगम नंदागवळी, के.ए.रंगारी, चेतन नंदागवळी, नंदेश्वर रामटेके आदी पदाधिकारी उपस्थित होते.