शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

कामधेनूने वाढविले २० टक्के दूध

By admin | Published: May 10, 2017 1:02 AM

जिकडे-तिकडे शेतकऱ्यांची विदारक स्थिती तसेच पारंपारिक शेतीतून उत्थान होत नसतांनाही कर्जाचे डोंगर घेऊन संसाराचा गाडा रेटणाऱ्या

नरेश रहिले। लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिकडे-तिकडे शेतकऱ्यांची विदारक स्थिती तसेच पारंपारिक शेतीतून उत्थान होत नसतांनाही कर्जाचे डोंगर घेऊन संसाराचा गाडा रेटणाऱ्या शेतकऱ्यांला पूरक व्यवसायाची मदत घ्यावी लागते. शेळी पालन, दुग्ध व्यवसायासाठी पशुपालन केले जाते. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच असताना दुसरीकडे ज्या गावाला कामधेनू दत्तक ग्राम म्हणून स्वीकारण्यात आले. त्या गावातील पशुपालकांना योग्य मार्गदर्शन करून दूध उत्पादनावर भर देण्यात आला. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील कामधेनू ग्राम म्हणून दत्तक घेतलेल्या ३२ गावातील दूध उत्पादन पूर्वीपेक्षा २० टक्याने वाढले आहे. गावात दूध उत्पादनात वाढ करण्यात यावी गाय, म्हशी पालनाला तांत्रीक जोड देऊन लसीकरणापासून जनावरे संवर्धनापर्यंतची जबाबदारी सांभाळण्याची किमया पशुसंवर्धन विभागाकडून कामधेनू दत्तक गावात करण्यात येते. गोंदिया जिल्ह्यात कामधेनू दत्तक ग्राम योजनेत ३२ गावांचा समावेश असून त्या गावात पूर्वीच्या तुलनेत २० टक्के दूध उत्पादन वाढले आहे. शेतकऱ्यांच्या पारंपारीक शेतीला पूरक जोड देणारा दुग्ध व्यवसाय वाढविला आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे सन २०१६-१७ या वर्षात कामधेनू दत्तक ग्राम म्हणून ३२ गावांची निवड केली. ३०० पैदास योग्य पशू असणाऱ्या या गावांची पशू गणना करून त्या गावांची कामधेनू दत्तक ग्राम म्हणून निवड करण्यात आली. एप्रिल महिन्यापासून १२ टप्यात पशू गणना करून सर्व निकष पूर्ण करणाऱ्या गावाला कामधेनू दत्तक ग्राम म्हणून पशूसंवर्धन विभाग स्विकारते. ज्या गावाला दत्तक घेतले त्या गावातील सर्व जनावरांचे लसीकरण, दुग्ध उत्पादन किती आहे. दूध उत्पादन वाढविण्यासाठी काय करता येईल, जनावरांची औषधे, खनिजद्रव्ये,जंतनाशक औषधी, गोचीड, शेतकऱ्यांची सहल नेणे, नाविन्यपूर्ण उपक्रम, संकरित वासरांचा मेळावा घेऊन त्यांना बक्षीस देणे, वैरण विकासासाठी प्रयत्न करणे, जनावरांच्या विस्तारासाठी कार्यक्रम घेणे, गोठा स्वच्छ करणे, चाऱ्याचे व खताचे व्यवस्थापन करण्यात येते. या दत्तक गावाला वर्षासाठी एक लाख ५२ हजार रूपये त्या गावाला जनवारांच्या संवर्धनासाठी देण्यात येतात. गावातील सर्वाधीक पशु मालकाला पशू मालक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली जाते. तसेच त्या मंडळाचे आत्मा या संस्थेतून नोंदणी केली जाते. शेतकऱ्यांचा व पशू मालकांचा आर्थिक विकास कसा होईल यावर यातून चर्चा घडवून आणली जाते. गोंदिया जिल्ह्यात ३२ गावात कामधेनू योजना राबविली जात आहे. अधिकाऱ्यांचा रात्री मुक्काम कामधेनू गावातील शेतकऱ्यांना व पशुमालकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक व त्यांचे इतर अधिकारी त्या गावात एक दिवस रात्रीचा मुक्काम ठोकतात. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ कशी करता येईल यावर मार्गदर्शन करतात. कामधेनू गावात पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे डॉ.वासनिक यांनी सांगितले. ही गावे कामधेनूचे दत्तक जिल्हा पशूसंर्वधन विभागाने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३२ गावांना दत्तक ग्राम म्हणून घेतले होते. त्यात झिलमीली, सतोना, तेढवा, देवरी, अंभोरा, मजीतपूर, जुनेवारी, ननसरी, पाऊलदौना, सुपलीपार, पिपरटोला, काहली, कोपालगड, नवेगाव, मूरपार, गडेगाव, पाऊलझोला, पांढरवानी, बाराभाटी, अरततोंडी, घटेगाव, रेंगेपार, शेंडा, घोटी, कालीमाटी, बघोली, वडेगाव, गराडा, चांदोरी (खु.), विहीरगाव, गोविंदपूर/मंगेझरी व मांडवी या ३२ गावांचा समावेश आहे.