भगवान विश्वकर्मा यांचे मंदिर आणि समाज भवनाच्या नियोजित जागेवर मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमात रोहित अग्रवाल यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. रोहित अग्रवाल यांनी आमदार निधीतून ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. समाजाला येणाऱ्या आर्थिक अडचणींकरीता वेळोवेळी मदत आणि सहकार्य करण्याचे कबूल केले. समाज मंदिर व समाज भवनाकरीता जागा दान करणारे सुरेश जांगडे आणि मंगला जांगडे यांचा सत्कार रोहित अग्रवाल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला. सरपंच भांडारकर, उपसरपंच लिला उके, ग्रामपंचायत सदस्य मनोहर साखरे, ममता वाढवे, चंद्रशेखर वाढवे उपस्थित होते. सरपंच भांडारकर यांनी समाजाकरिता जागेवर पाण्याची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला हरिचंद आगरे, भास्कर जांगडे, श्याम सांडेल, कवडू खळोदे, राधेश्याम खळोदे, नाथुराम विश्वकर्मा उपस्थित होते.
खमारीत भगवान विश्वकर्मा जयंती साजरी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:29 AM