लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धान उत्पादनात पुढे असलेला जिल्ह्याला काही दिवसांपासून परतीच्या पावसाने झोडपल्याने खरीपातील धान पिकाला जोरदार फटका बसला आहे. हलके व मध्यम प्रजातीचे धान काही ठिकाणी निसवून कापणीच्या स्थितीत आहे. तर काही ठिकाणी उशीरा लागवड केलेले धान पीक अतिवृष्टीमुळे सडले. पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात आलेल्या वादळी पावसाने व जोरदार संततधारेने शेकडो एकरातील धान भुईसपाट झाले आहे. पावसामुळे धान खाली पडल्याने शेतशिवारात पिकाचा सडका वास येत आहे.कित्येक शेतकरी धानासह तूर पिकावर महागडी औषधे फवारणी करताना दिसत आहेत. तीन वर्षाचा दुष्काळ झेलत हिंमतीने शेतकऱ्यांनी यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना यावर्षीही पावसाचा फटका बसला आहे.जून महिन्यात पावसाच्या अत्यल्प हजेरीने शेतकऱ्यांनी पेरणी, रोवणी अर्धी लांबली होती.जुलै महिन्यात समाधानकारक पावसाला सुरुवात झाली खरी, परंतु पावसाने काही ठिकाणीच हजेरी लावली. सुरुवातीच्या कालखंडात योग्य वेळी पाऊस न झाल्याने बºयाच शेतकऱ्यांना रोवणी पूर्ण करता आली नाही.ऑगस्ट महिन्यात हजेरी लावलेल्या पावसामुळे निंदनासह शेती कामांना खऱ्या अर्थाने पुन्हा वेग आला होता. त्यानंतर मात्र संततधार पावसामुळे धान कमी पण तण जास्त, अशी स्थिती झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. सप्टेंबर महिना अखेरपर्यंत समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु पावसाची रिपरिप लवकर बंद न झाल्याने काही तालुक्यातील धानपिक जागेवर सडले. आजही शेतशिवारात त्यांची दुर्गंधी पसरत आहे. दिवसभर ढगाळ हवामानामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. धानाला तुडतुडा, अळी, करपा, कडाकरपा सारख्या रोगांनी तर तूर पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.निसवणाऱ्या अवस्थेतील धानाच्या लोंबी पूर्णत: पांढरे होत असून त्याचा परिणाम दाने भरण्यावर झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात दाने पोचटच असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना योग्य सल्ला देऊन उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान टाळता येऊ शकते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करुन गावागावात मार्गदर्शन शिबिर सुरु करणे गरजेचे आहे.हमीभाव कागदावरचजिल्ह्यात खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर प्रारंभी पावसाने हजेरी लावली. परंतु काही दिवसात दिर्घ उसंत घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीचे नियोजन चुकले. नंतर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. ऑक्टोबर महिन्यात आलेल्या परतीच्या पावसाने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. एकीकडे पाण्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. एकीकडे पाण्यामुळे कपाशीची गळती तर दुसरीकडे परतीच्या पावसाने कापणी केलेले धान ओले असे चित्र गोंदिया जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी मृगाच्या पावसाने चांगली हजेरी लावली होती. मात्र नंतर दडी मारली.सप्टेंबर महिन्यात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले. तालुक्यात हलके धान निघाले १८ ते २० पण समाधानकारक दर न मिळाल्याने शेतकरी हैरान झाला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला कमी प्रमाणात ओलसर असला तरी प्रमाण अधिक असल्याचे सांगून भाव कमी देत आहे.शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणीधान पिकाची स्थिती फारच बिकट असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. धान पिकावर केलेला खर्च निघतो की नाही अशी धडकी शेतकऱ्यांना भरली आहे. मंजुराअभावी शेतकरी हैरान असल्याचे दिसून येत आहे. लागवडीवर प्रचंड खर्च करुनही उत्पन्न किती होईल याचा अंदाज सुध्दा बांधणे कठीण झाले.निघालेल्या उत्पादनाला अल्प प्रमाणात असलेला बाजारभाव यामुळे लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे.
खरीप पिकाचे उत्पादन घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 5:00 AM
खरीपातील धान पिकाला जोरदार फटका बसला आहे. हलके व मध्यम प्रजातीचे धान काही ठिकाणी निसवून कापणीच्या स्थितीत आहे. तर काही ठिकाणी उशीरा लागवड केलेले धान पीक अतिवृष्टीमुळे सडले. पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : बदलत्या वातावरणाचा पिकांवर परिणाम