देवरी : संपूर्ण गावात स्वच्छता राहावी प्रत्येकाच्या घरी शौचालय व्हावे, यासाठी राज्य सरकारने स्वच्छ भारत अंतर्गत मागेल त्याला शौचालय देण्याची योजना आखली. प्रत्येक अर्जदाराला शौचालयाची अनुदान राशी दिली. परंतु अजुनही ग्रामीण भागात या संदर्भात जागृकता झाली नाही. ग्रामीण भागातील लोक अजुनही उघड्यावर शौचास जात आहेत. शेडेपार व कन्हाळगाव ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने गुडमार्निग फेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीमध्ये उघड्यावर शौचास बसणाऱ्या व्यक्तीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शेंडेपार येथील सरपंच देवकी कुरसुंगे, कन्हाळगाव येथील सरपंच कौशल्या राऊत, उपसरपंच पुरुषोत्तम पारधी सदस्य सदाराम हटवार, नारायण राऊत, मनोज सरजारे, अशोक राऊत, सचिव सानप, कंपानंद सरजारे, शिशूपाल तिरपुडे, कैलाश शहारे, भुमेश्वर रहांगडाले व ग्राम पंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
शेडेपार व कन्हाळगाव येथे ‘गुडमार्निग’ फेरीची दस्तक
By admin | Published: January 08, 2017 12:20 AM