राजेश मुनिश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : शासन जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. मात्र दुसरीकडे तालुक्यातील जि.प.शाळांच्या जीर्ण इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. मात्र याकडे शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधींचे सुध्दा दुर्लक्ष केले आहे.सडक-अर्जुनी तालुक्यात वर्ग १ ते ५ च्या १०९ शाळा आहेत. तर वर्ग ६ ते ८ च्या ३६ शाळा आहेत. त्यात प्राथमिक शाळेतील ६ हजार १०५ विद्यार्थी संख्या असून वरिष्ठ प्राथमिक शाळेत १ हजार ८०३ विद्यार्थीची पटसंख्या आहे. तालुक्यात एकूण १४७ शाळा आहेत त्यात ३७६ शिक्षक कार्यरत आहेत. बहुतेक शाळेत शिक्षकांच्या रिक्त जागा न भरल्याने शेंडा केंद्रातील कोयलारी शाळेत एक शिक्षक चार वर्ग सांभाळत आहे. कोयलारी हे गाव आदिवासी बहुल असून घनदाट जंगलाच्या पायथ्याशी आहे. शाळेला सुरक्षा भिंत नसल्यामुळे हिस्त्र प्राणी शाळेच्या आवारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांना पिण्याची पाण्याची सुविधा नाही. वीज नसल्यामुळे डिजीटल शाळा होवूनही संगणक बंद पडले आहेत. शाळेची इमारत जुनी असल्यामुळे इमारत पूर्णपणे मोडकळीस आल्या आहेत. तर तालुक्यातील चिखली केंद्रातील कोसमघाट येथील प्राथमिक शाळेत वर्ग १ ते ४ चे विद्यार्थ्याना शिक्षण दिले जात आहे. शाळेला सुरक्षा भिंत नाही. मुलांना खेळण्यासाठी पटांगण नाही, मागील आठ वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या इमारतीला ठिकठिकाणी भेगा गेल्या आहेत. नवीन वर्गखोलीची नितांत गरज असून याकडे शिक्षण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी खंत व्यक्त केली. शाळेतील स्वच्छतागृहाची अवस्था सुध्दा अवस्था सुध्दा बिकट झाली आहे.रिक्त पदाने प्रभाऱ्यावर भारसडक-अर्जुनी तालुक्यात शिक्षण विभागाचे नऊ केंद्र आहेत. त्यामध्ये सौंदड, डव्वा, पांढरी, कोसमतोेंडी, चिखली, कोकणा जमी., सडक-अर्जुनी, डोंगरगाव डेपो, शेंडा हे केंद्र आहेत. पाच केंद्रप्रमुखांची नियुक्ती केली आहे. तर चार प्रभारी कर्मचाºयांकडे पदभार दिला आहे. मात्र रिक्त असलेली पदे भरण्याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
जीर्ण इमारतीत विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:22 PM
शासन जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. मात्र दुसरीकडे तालुक्यातील जि.प.शाळांच्या जीर्ण इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.
ठळक मुद्देशिक्षण विभागाचे दुर्लक्ष : लोकप्रतिनिधी गप्प