शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कोया पुनेमला उसळला जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2016 2:02 AM

देशातील १६ ते १७ राज्यातून कचारगड येथे दाखल झालेल्या आदिवासी समाजाच्या विविध आयोजनांमुळे विशेष करुन गोंडी धर्मीय ...

आदिवासी कलावंतांचा आविष्कार : कचारगडच्या कुशीत घडले गोंडी संस्कृतीचे दर्शन विजय मानकर सालेकसादेशातील १६ ते १७ राज्यातून कचारगड येथे दाखल झालेल्या आदिवासी समाजाच्या विविध आयोजनांमुळे विशेष करुन गोंडी धर्मीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पाच दिवसीय मेजवानीमुळे कचारगडच्या कुशीत गोंडी संस्कृतीचे दर्शन प्रत्यक्ष घडून आल्याचे दिसले. मागील ३० वर्षांपासून चालत असलेली कचारगड यात्रा यंदा यशस्वी आयोजनाचे शिखर गाठताना दिसून आली. दरवर्षी माघ पौर्णिमेनिमित्त सुरू होणारी कचारगड यात्रा यंदा २० फेब्रुवारीला सुरू झाली. पहिल्या दिवसापासूनच येथे भाविकांची रीघ लागली. २१ फेब्रुवारीला ध्वजारोहणानंतर शंभूसेकची भाविकांचा ओघ कचारगडकडे वाढला. हळूहळू देशाच्या कोणा-कोपऱ्यातून आदिवासी भाविक येथे दाखल घेऊ लागले. पाहतापाहता लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी वाढू लागली. २२ फेब्रुवारी रोजी कोया पूनेम (माघ पौर्णिमा) पूजा असून या दिवशी आदिवासी समाजाचा जनसागर उसळल्याचे चित्र पहावयास मिळाले. या एकाच दिवशी चार लाखापेक्षा जास्त भाविक येथे येऊन कोया पूनेमी पूजा करून आपल्या पूर्वजांना नवस फेडण्याचे काम आदिवासी महिला-पुरूषांनी केले आहे. ज्यांना २२ पर्यंत शक्य झाले नाही त्यांनी २३, २४ व २५ फेब्रुवारीपर्यंत स्थळ गाठले व कचारगड गुफेत आपल्या पूर्वजांची आठवण केली. कोया पूनेम महोत्सवात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले. या राज्यातील मोठ्या प्रमाणात असलेले आदिवासी मोठ्यमोठ्या समुहाने येथे दाखल होताना दिसून आले. त्यांच्या प्रत्येक समुहात आदिवासींचे सप्तरंगी गोंडी ध्वज पकडून आणि विविध वाद्य, ढोल, सनई, किंदरी, मांदरी आदी वाद्यांच्या मधूर संगीतात भाविकांचा लोंढा कचारगडच्या दिशेने येताना दिसत होता. पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून तर रात्रीपर्यंत छत्तीसगड आणि झारखंड येथील संपूर्ण आदिवासी आपल्या घराला कुलूप लावून आले की काय, असे मत काही लोक व्यक्त करीत होते. २१ फेब्रुवारी रोजी संत रोहिदास जयंती व पंतप्रधान नरेंद्र मोदी शेजारच्या डोंगरगड येथे आले होते. त्यामुळे छत्तीसगडचे भाविक २१ रोजी मोदींच्या कार्यक्रमात आणि संत रोहिदास जयंती कार्यक्रमात व्यस्त होते. त्यामुळे २१ ऐवजी २२ व २३ ला मोठ्या प्रमाणात आले, असे मानले जात होते. परंतु काही भाविकांशी प्रत्यक्ष चर्चा करून माहिती घेतल्यास त्यांनी म्हटले की, कोया पूनेमी पूजेचा महत्व माघ पौर्णिमेदिवशी १५ व्या तिथीला जास्त असते. त्यामुळे आदिवासी लोक माघ पौर्णिमेच्या दिवशी येथे दाखल होण्यास महत्व देतात.गोंडी गीतांतून गौरवगानया ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाव्यतिरिक्त साहित्यकार, कवी, इतिहासकार, संशोधक, धर्माचार्य आदीनींसुध्दा गोंडी संस्कृतीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती सादर केली. काहींनी आपल्या कवितांच्या माध्यमातून, काहींनी गोंडी गीतांच्या माध्यमातून गोंडी संस्कृतीचा गौरवगान केला. त्यांनी आपापल्या पध्दतीने आदिवासी समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न केले. दरम्यान अनेक आदिवासी समाजाचे उच्चपदावर कार्यरत राजकीय मंडळी खासदार, आमदार, आयुक्त, कलेक्टर, सीओ, श्रेणी-१ चे अधिकारी असलेले भाविक येऊन कोया पूनेमी पूजा करून गेले. त्यांनी स्थानिक समितीला आपली ओळख न देताच धार्मिक भावना जपून महापूजा करून निघून गेले. कोणताही अनुचित प्रकार नाहीमागील ३२ वर्षीपासून चालत असलेल्या या कोया पूनेम महोत्सवात कोणताही अनुुचित प्रकार घडला नाही. भाविकांची संभावित संख्या बघत प्रशासनाने भौतिक सोयी, सुरक्षा व्यवस्था व सतत योग्य प्रकारे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आहे.