महिलांना जनधनच्या मानधनाची प्रतीक्षा
गोरेगाव: गरीब महिलांना आर्थिक बळ म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात अनुदान जमा केले होते. मात्र आता अनुदान जमा झालेले नाही.
ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट
सालेकसा : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.
नाल्यांअभावी सांडपाणी रस्त्यावर
गोंदिया : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले. मात्र, पुरेशा नाल्या खोदल्या नाहीत. ज्या ठिकाणी नाल्या खोदल्या तेथील नाल्याही नागरिकांनी बुजवून टाकल्या आहेत.
शेतकरी वळले सौरपंप संयंत्राकडे
केशोरी : अलीकडे महावितरण कंपनीच्या भरमसाठ दरवाढीमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या भरवशावर वीज बिल भरणे परवडणारे नाही. यामुळे या परिसरातील शेतकरी सौरपंप संयंत्राकडे वळत आहेत.
ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था
गोंदिया : रेती वाहतुकीच्या अवजड आणि ओव्हरलोड वाहनांमुळे राज्य मार्गावरील भंडारा-तुमसर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक तालुक्यातील रेती घाटालगतच्या गावातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. याचा नाहक भुर्दंड बांधकाम विभागाला बसत असल्याचे दिसत आहे.
अभयारण्यामुळे शेतजमिनी ओसाड
गोंदिया : जल, जंगल, जमीन, प्राणी यांचे संवर्धन करताना व्याघ्र प्रकल्प, अभयारण्याची निर्मिती आवश्यक असली तरी मानवी हिताचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. शेतजमिनीचे अधिग्रहण अद्याप झाले नाही.
‘ऑनलाइन’ खरेदी तेजीत
भंडारा : ग्रामीण भागापर्यंत ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याच्या व्यवहाराला कोरोनामुळे जास्त महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसत आहे. पैशांची बचतही होत असल्यामुळे अनेकजण ऑनलाइन वस्तू खरेदी करत असल्याचे दिसत आहे. मात्र अनेकदा काही फसव्या योजनांमुळे अनेकदा ग्राहकांच्या खात्यातून पैसे गेल्याच्याही तक्रारी वाढत आहेत.
बेरोजगारीत वाढ
सानगडी : महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले हजारो तरुण, तरुणी नोकरीच्या शोधार्थ आहेत. कोरोनाने सर्व उद्योगधंदे थांबले असल्याने नोकरी शोधण्यात अनेकांना अपयश येत आहे. अपयश व बेरोजगारीमुळे युवा पिढी नैराश्येत लोटली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
रस्त्याच्या नूतनीकरणाने अपघाताला आमंत्रण
मुंडीकोटा : दहा दिवसांपूर्वीच माडगी देव्हाडी रस्त्याचे रखडलेले नूतनीकरण पूर्ण करण्यात आले असून, या रस्त्यावर बारीक काळी चुरी घालण्यात आली आहे. या चुरीमुळे दुचाकी वाहन घसरण्याचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे अपघाताची भीती वाढली आहे. सदर रस्त्याचे नूतनीकरण जनतेच्या सोयीसाठी, की अपघाताला आमंत्रण देण्याकरिता आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशासकीय समित्या कागदोपत्रीच
सालेकसा : सामान्य जनतेच्या हितार्थ शासनस्तरावरून लोकोपयोगी अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली आहे. समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत; परंतु केवळ कागदोपत्रीच आहेत.
शहरात मोकाट जनावरांचा मुक्तसंचार
आमगाव : आमगाव रोड परिसरात दिवसेंदिवस मोकाट जनावरांचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसा व रात्री मोकाट जनावर वावरत आहेत. शहरातून राज्य महामार्ग असल्यामुळे रस्त्याने वर्दळ अधिक असते. यामुळे नागरिकांना येण्या-जाण्यात फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बँकेत दलालामार्फत सर्वसामान्यांची लूट
तिरोडा : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.
कचरा पेट्यांअभावी दुर्गंधी बळावली
सडक-अर्जुनी : काही वॉर्डात नगरपरिषदेच्या वतीने कचरा पेट्या ठेवण्यात न आल्याने ठिकठिकाणी कचरा पसरलेला दिसतो.