शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

एटीएममध्ये सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:26 AM

ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट गोरेगाव : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहेत. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू ...

ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट

गोरेगाव : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहेत. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी पारंपरिक झाडू व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत. हाच प्रकार अन्य व्यवसायाबाबत दिसून येत असून, ग्रामीण कारागीर सुद्धा अडचणीत आहेत.

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

नवेगाव बांध : वन्य हिंस्र प्राण्यांनी शेतशिवार व गाव परिसरात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांवर हल्ला करून जखमी करणे किंवा त्या प्राण्यांना ठार मारणे सुरू केले आहे. हिंस्र प्राण्यांच्या धुमाकूळामुळे जंगल प्रवण व त्यास लागून असलेल्या भागात अधिवास करणारे नागरिक चांगलेच भयभीत झाले असून आहेत. वन्यप्राण्यांचा हैदोस बघता वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

महिनाभरात डांबरी रस्त्यांवर खड्डे

आमगाव : परिसरात निम्म्याहून अधिक रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत डांबरीकरण करण्यात आले आहेत. बहुतांश डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवर महिनाभरात खड्डे पडले आहेत. या रस्त्यांना खड्ड्यात पॅचेस लावले जात आहेत. अल्प कालावधीत रस्त्यावर खड्डे पडल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. या संपूर्ण रस्ते बांधकामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

रेतीमुळे घरकुलाचे स्वप्न अधांतरीच

सालेकसा : पर्यावरणाचे कारण सांगत शासनाने रेतीघाट लिलाव केलेले नाहीत. असे असतानाही याच शासनाने रस्ता तथा इमारत बांधकाम, घरकूल बांधकाम मंजूर केले आहेत. रेतीला परवानगीच नाही तर ही कामे होणार तरी कशी, असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे. अशातच काही रेती तस्कर चांगलाच फायदा घेत आहेत. सर्रास रेतीची चोरी करून वाहतूक सुरू आहे. अव्वाच्या सव्वा दराने रेती विक्री होत असल्याने बांधकाम कसे करावे, असा प्रश्न पडला आहे.

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी

देवरी : परिसरातील शेतशिवारात अनेक मोकाट कुत्री असून, ती एकटी महिला किंवा पुरुष पाहून हल्ला करतात. पाळीव जनावरांनाही ती जखमी करीत आहेत.

ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यात वाढ

गोरेगाव : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. काही गावात चोरटे भरदिवसा शिरून चोरी करीत आहेत. यामुळे लहान व्यावसायिकांत भीती आहे.

रस्त्यावरील बांधकाम साहित्याने अपघात

गोंदिया : बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकले जाते. रेती, गिट्टी, लोखंड रस्त्यावर पडून राहत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. रेतीवरून अनेक वाहने घसरून पडत आहेत.

तंटामुक्त समितीचे तंट्याकडे झाले दुर्लक्ष

तिरोडा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंतर्गत तंटामुक्त घोषित झालेल्या गावांना शासनाने बक्षीस रूपात रक्कम दिली. मात्र रक्कम मिळाल्यानंतर समित्यांचे तंट्याकडे दुर्लक्ष आहे.

उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता

देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे वाहन बाहेर काढणे कठीण होत आहे.

घोगरा ते देव्हाडा रस्ता देतोय अपघाताला आमंत्रण

मुंडीकोटा : जवळील घोगरा ते देव्हाडा हा रस्ता जीर्ण झाला असून, अपघाताला आमंत्रण देत आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. घोगरा ते देव्हाडा हा मुख्य रस्ता असून, या रस्त्याने बरेच नागरिक, तसेच शाळकरी विद्यार्थी तुमसर येथे शिक्षणासाठी जातात. देव्हाडा या गावी दर बुधवारी आठवडे बाजार भरतो व त्यामुळे घाटकुरोडा येथील अनेक नागरिक भाजीपाला विकण्याकरता देव्हाडा येथे जातात. देव्हाडा येथील एलोरा पेपर मिल असून, या पेपर मिलमध्ये घोगरा व पाटीलटोला येथील कामगार रात्री-बेरात्री पेपर मिल येेथे कामावर जातात. एखाद्या व्यक्तीची प्रकृती जास्त बिघडली तर याच मार्गाने तुमसर येथील दवाखान्यात न्यावे लागते. घोगरा ते देव्हाडा हा मुख्य रस्ता असून, देव्हाड्याहून नागपूर ते गोंदिया महामार्गाला जुळला आहे. देव्हाडा येथून गोंदिया ते नागपूर एसटी बस नेहमीच धावत असतात. या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते व त्यामुळे हा रस्ता जीर्ण झाला असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. रस्त्यावरील गिट्टी व मुरूम उखडून बाहेर आले आहे. या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिक व विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करून रस्ता पार करावा लागतो. त्यामुळे अनेकांची तारेवरची कसरत होते. विशेष म्हणजे, तुमसर आगाराची तुमसर ते तिरोडा व्हाया घाटकुरोडा मार्गे प्रवासी बस या जीर्ण रस्त्यामुळे बंद पडली. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांचे हाल होत आहेत. या मार्गावर आता कोणतीच बस नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी आहे.

पानगाव-सोनपुरी-खेडेपार रस्ता खड्ड्यात

सोनपुरी : सालेकसा तालुक्यातील पानगाव- सोनपुरी- खेडेपार रस्ता मध्यप्रदेशला जोडणारा एकमेव रस्ता आहे. यंदाच्या संततधार पावसामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागांनी रस्त्याची दुरुस्ती केली नाही. परिणामी, नागरिकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे.