ऑनलाईन लोकमतगोरेगाव : तालुक्यातील पिंडकेपार, गराडा, हिरापूर, कुऱ्हाडी, कटंगी, पाथरी, भुताईटोला, तिमेझरी, बागळबंध, मलपुरी, रामाटोला, मेंगाटोला या गावांना मंगळवारी रात्री आलेल्या गारपीट व अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला.प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (दि.१३) रात्रीला आलेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे सर्वाधिक फटका बसला. गारपिटीसह आलेल्या वादळी वारा व पावसामुळे मातीच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर अनेकांच्या घरावरील कवेलू उडाल्याचे चित्र आहे. बुधवारी (दि.१४) सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पं.स. सदस्य केवलराम बघेले, डुमेश चौरागडे, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, वनक्षेत्राधिकारी जाधव व युवा शक्ती मंचच्या सदस्यांनी पिंडकेपार गावाला भेट दिली. पिंडकेपार येथे अनेक ठिकाणी गारांचा खच जमा झाल्याचे चित्र होते. तर अनेकांच्या घरावरील छत उडाल्याचे चित्र पाहयला आहे. यातील एका पीडित फगना साखरे याला केवलराम बघेले यांनी आर्थिक मदत दिली. गराडा येथील दोन विद्युत खांब जमीनदोस्त झाले तर गावागावात हरभरा, जवस, लाखोळी, गहू, सरसो, टरबूज, भाजीपाला, केळी इत्यादी पिकांचे नुकसान झाले. शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गराडाचे सरपंच शशेंद्र भगत, पं.स. सदस्य केवलराम बघेले, डुमेश चौरागडे, हिरापूरचे उपसरपंच भूपेश गौतम, कटंगीचे शेतकरी टेकेश्वर रहांगडाले यांनी केली आहे.पक्ष्यांचा मृत्यूतालुक्यात गारपीट व वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक पक्षांना आपला जीव गमवावा लागला. अनेक ठिकाणी पाळीव प्राणी व वन्यजीव प्राण्यांनाही इजा झाल्याची चर्चा आहे.अनेक ठिकाणी बत्ती गुलतालुक्यातील बऱ्याच गावात वीज तारा तुटल्या तर कुठे विद्युत खांब जमीनदोस्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून बऱ्याच ठिकाणी वीज पुरवठा खंडीत आहे.भीमराज साखरे यांचे शाळेत बस्तानपिंडकेपार येथील रहिवाशी भीमराज साखरे यांचे घर पूर्णत: जमीनदोस्त झाल्यामुळे त्यांना परिवारासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.बाधित क्षेत्राची पाहणीमंगळवारी आलेल्या गारपीट, वादळी वारा व पावसामुळे तालुक्यातील बºयाच घरांचे व शेतीचे नुकसान झाले. पालकमंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी काळे यांनी तालुक्यातील बाधित क्षेत्रात बुधवारी (दि.१४) पाहणी केली. भंडगा येथे अंशत: ५४ घरे, मुंडीपार १७०, पिंडकेपार येथे अंशत: ७५ घरे व तर भीमराज साखरे यांचे घर पूर्णत: जमीनदोस्त झाले. खोसेटोला १६० घरे, पालेवाडा २०, कवडीटोला ३, कालीमाटी ३, हिराटोला ७, खोसेटोला ३० गोठे, घुमर्रा २, कलपथारी २०, बाम्हणी २०, चोपा १०, बोरगाव ७, सुखपूर ५, सोनेगाव ६, बघोली ५, नवरगाव ५ यासह अनेक घर अंशत: पडलेली असून आकडे येणे बाकी आहे.
गारपीट व पावसामुळे तालुक्यात लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 9:31 PM
तालुक्यातील पिंडकेपार, गराडा, हिरापूर, कुऱ्हाडी, कटंगी, पाथरी, भुताईटोला, तिमेझरी, बागळबंध, मलपुरी, रामाटोला, मेंगाटोला या गावांना मंगळवारी रात्री आलेल्या गारपीट व अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला.
ठळक मुद्देपक्ष्यांचा मृत्यू