लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देवरी तालुक्यातील डोंगरगावला बुधवारी (दि.१५) सायंकाळी आलेल्या चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. चक्रवादामुळे डोंगरगाव येथील ३०० वर घरांची पडझड झाली. तर विद्युत खांब आणि मोठ्या प्रमाणावर झाडे देखील कोसळली. चक्रीवादळ पावसाचा फटका शेतीला सुध्दा बसला असून यामुळे ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल महसूल विभागाने सादर केला आहे.जिल्हावासीय देशाच्या ७२ व्या वर्धापन दिनाचा सोहळा साजरा करीत असताना दुसरीकडे देवरी तालुक्यातील डोंगरवासीयांवर अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागले. बुधवारी (दि.१५) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे काहीच क्षणात गावात होत्याचे नव्हते झाले. चक्रीवादळामुळे अनेक गावकऱ्यांच्या घरावरील छत उडाले. तर काहींच्या घरांची भिंती कोसळली तर कुणाचे गोठा कोसळला. तर गावातील तीन जणांचे घर पूर्णपणे जमीनदोस्त झाले. चक्रीवादळामुळे गावातील २८ विद्युत खांब व नऊशेवर झाडांची पडझड झाली. दरम्यान दीड ते दोन तास मुळसळधार पाऊस आणि चक्रीवादामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. चक्रीवादामुळे डोक्यावरील छत हरविल्याने बऱ्याच गावकऱ्यांनी रात्र जागून काढली. गुरुवारी (दि.१६) दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर गावकऱ्यांनी वादळामुळे उडालेले सामान गोळा करण्याच्या कामाला सुरूवात केली. विशेष म्हणजे प्रशासनाचे अधिकारी या गावात तब्बल १६ तासानंतर मदतीसाठी पोहचले. आ.संजय पुराम यांनी डोंगरगावला सकाळीच भेट देवून गावातील नुकसानीची पाहणी केली. तसेच त्वरीत मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांना दिले. डोंगरगाव येथील सर्व नागरिकांच्या जेवनाची व राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. दरम्यान यानंतर मदत कार्याला सुरूवात झाली. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी या सर्व प्रकाराची दखल घेत झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करण्याचे निर्देश दिले. चक्रीवादळामुळे छत्र हरपलेल्या नागरिकांची सोय सुभाष हायस्कूल येथे केली. महसूल विभागाने चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे शनिवारी (दि.१८) सादर केला. त्यात चक्रीवादळामुळे २७७ घरांचे अशंता तर ३० घरांचे पूर्णत: नुकसान झाले. २८ विद्युत खांब कोसळल्याने वीज वितरण कंपनीचे ७ लाख रूपयांचे नुकसान झाले.तर शेतीचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. वादळामुळे ९०० झाडांची पडझड झाली. यामुळे डोंगरगाव येथील गावकऱ्यांचे ६० लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकसानग्रस्तांना लवकरच आर्थिक मदतीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे.गावकऱ्यांना ताडपत्रीचे वाटपचक्रीवादळामुळे डोंगरगाव येथील अनेक गावकऱ्यांच्या घरावरील छत उडाले. यामुळे त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे. दरम्यान त्यांचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे १४२ गावकऱ्यांना ताडपत्रीचे वाटप करण्यात आले.अनेकांनी दिली डोंगरगावला भेटचक्रीवादळाचा फटका बसलेल्या डोंगरगावला विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट दिली. माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, जिल्हा काँग्रेसचे सहषसराम कोरोटे यांच्यासह अन्य मान्यवरांनी भेट देवून नुकसानग्रस्तांना त्वरीत मदत देण्याची मागणी केली आहे.चक्रीवादळामुळे डोंगरवासीयांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरीत सर्वेक्षण करुन त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी. तसेच येथील गावकऱ्यांना दैनदिन उपयोगाच्या वस्तुंचा प्रशासनाने पुरवठा करावा.- टोलसिंग पवार, माजी जि.प.अध्यक्ष..............................................चक्रीवादळचा फटका बसलेल्या गावकऱ्यांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे काम प्रशासनातर्फे युध्द पातळीवर सुरू आहे. गावकऱ्यांना ताडपत्रीचे वाटप करण्यात आले असून इंधनासाठी प्रती कुटुंब दोन लिटर रॉकेल देण्यात आले. नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविला आला आहे.- विजय बोरुडे, तहसीलदा देवरी.
चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:29 PM
देवरी तालुक्यातील डोंगरगावला बुधवारी (दि.१५) सायंकाळी आलेल्या चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. चक्रवादामुळे डोंगरगाव येथील ३०० वर घरांची पडझड झाली. तर विद्युत खांब आणि मोठ्या प्रमाणावर झाडे देखील कोसळली. चक्रीवादळ पावसाचा फटका शेतीला सुध्दा बसला असून यामुळे ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल महसूल विभागाने सादर केला आहे.
ठळक मुद्दे३०० घरांची पडझड : शेतकऱ्यांना फटका, मदतकार्याला सुरुवात