गोंदिया : पूर्व विदर्भात जंगलात मोहफूल व पळसाच्या झाडावर लाखाचे उत्पादन घेतले जाते. या भागात लाख व मोहफूलापासून ग्रामीणांना मिळकत मिळते. हे दोन्ही व्यवसाय शासनाच्या उदासीन धोरणामुळे उपेक्षीत आहे. परंतु आता लाख व मोहफूलाची खरेदी समर्थन मूल्याच्या आधारावर केली जाऊ शकते. गोंदिया जिल्ह्यात मोहफूलाचे पाच लाख झाडे आहेत. आदिवासी भागात हे मोहफूलाचे झाडे असतात. वनविभागाच्या जंगलात मोहफूलाची तीन लाख झाडे असल्याची शक्यता वणविभागाकडून वर्तविली जात आहे. मोहफूल वेचून आपला उदरनिर्वाह चालविण्याचे काम आदिवासी भागातील नागरिक करतात. तीन महिन्यापर्यंत हा रोजगार त्यांना मिळतो. मोहफूलाला शासनाने परवानगी न दिल्यामुळे चोरीने मोहफूलाची वाहतूक ही केली जाते. मोहफुलाची साठवण करुन ठेवणे किंवा विक्री करणे यावर राज्य शासनाने बंदी ठेवल्यामुळे हा व्यवसाय उपेक्षीत आहे. मोहफूलाला योग्य किंमत मिळत नाही. मोहफूलाला व लाखाला आधारभूत किंमतीत खरेदी करण्याचा प्रस्ताव वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांच्या समोर ठेवण्यात आला. या प्रस्तावाला त्यांनी सकारात्मक दृष्टीने पाहिले आहे. जिल्हा स्तरावर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नवीन प्रस्ताव योग्य पद्धतीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)गोदामांची सोय करागोंदिया जिल्ह्यात गोदाम उपलब्ध नसल्यामुळे धान पाण्यात सडतो. तर मोहफूल खरेदी केले तर ठेवणार कुठे असा प्रश्न वनमंत्र्यांनी केला. परंतु यावर सकारात्मक पाऊले उचलले जाणार असल्याचे संकेत आहेत.वनमंत्र्यासोबत मोहफूल व लाख खरेदीवर सकारात्मक चर्चा झाली. आदिवासी विकास महामंडळाला एजेंसी बनवून आबकारी विभागाकडे आधी नोंदणी केली जाईल. या प्रक्रियेत दोन-तीन महिने लागतील. वनमंत्री वित्तमंत्री असल्यामुळे यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. अधिकाऱ्यांची या संदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार आहे.- आ.संजय पुरामआमगाव विधानसभा क्षेत्र
आधारभूत मूल्यावर खरेदी होणार लाख व मोहफूल
By admin | Published: January 10, 2016 2:01 AM