शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

लेक लाडकी पुन्हा रूसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 9:19 PM

शासन ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानावर भर देत आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यात हे अभियान केवळ कागदावरच राबविले जात असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात सतत घट होत असल्याने भविष्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

ठळक मुद्देमुलींच्या जन्मदरात घट : ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान कागदावरच

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासन ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानावर भर देत आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यात हे अभियान केवळ कागदावरच राबविले जात असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात सतत घट होत असल्याने भविष्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. दरवर्षी मुलींच्या जन्मदरात घट होत आहे. सद्यस्थितीत एक हजार मुलांमागे ९३२ मुली असे प्रमाण आहे.मुलगा मुलगी एक समान, मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी, असे कितीही म्हटले जात असले तरी अद्यापही समाजात मुलींना मुलांच्या बरोबरीचे स्थान दिले जात नसल्याचे विदारक चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी शासन व प्रशासनातर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र त्याचा फारसा फरक पडलेला नाही. मुलींचा जन्मदर सुधारण्यासाठी सरकारतर्फे सुकन्या योजना, मेरी बेटी भाग्यश्री सारख्या योजना राबविल्या जात आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून या योजनांची अंमलबजावणी आणि जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात नसल्याने मुलींच्या जन्मदरात सातत्याने घट होत आहे. ग्रामीण भागात स्त्री भू्रणहत्या होत असल्याचा संशय सुध्दा बळावला आहे. त्यामुळे मुलींच्या जन्मदरात घट झाली आहे. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सन २०१६ मध्ये सर्वाधिक होता. एक हजार मुलांमागे ९९७ मुली असे प्रमाण होते. मात्र यानंतरचा आढावा घेतला तर सन २०१० मध्ये ९२९, २०११ मध्ये ९५४, व सन २०१२ मध्ये ९२९ मुलींचा जन्मदर होता. सन २०१४ मध्ये ९४४, २०१५ मध्ये ९३३, त्यानंतर २०१७ मध्ये ९३३ तर २०१८ मध्ये ९३२ मुलींचा जन्मदर आहे.आदिवासी व नक्षल प्रभावित गोंदिया जिल्ह्याचा मुलींचा जन्मदर देशात व राज्यापेक्षा अधिक आहे. परंतु दिवसेदिवस होत असलेली घट चिंतेचा विषय ठरत आहे. जिल्ह्यात महिला-पुरुष जन्मदर सन १९९१ मध्ये ९९५, २००१ मध्ये १००५ होता, २०११ मध्ये ९९६ होता. परंतु ६ वर्षात मुलींच्या जन्मदरात घट झाली आहे. १९९१ मध्ये ९७८, २००१ मध्ये ९५८, २०११ मध्ये ९४४ होता. जिल्ह्यात २००१ मध्ये मुलींच्या जन्मदराची चांगली स्थिती होती. त्यानंतर मुलींच्या जन्मदरात सतत घट झाली आहे. सन २०१८ मध्ये सर्वात कमी ९३२ जन्मदर आहे. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी उपाय योजना करण्याची गरज आहे.देवरी तालुक्यात मुलींचा जन्मदर कमीजिल्ह्यात देवरी तालुक्यात सर्वात चिंताजनक स्थिती आहे. नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल तालुक्यात एक हजार मुलांमागे ८७० मुली असा जन्मदर आहे. गोरेगाव तालुक्यात ९०८ व तिरोडा तालुक्यात ९१६ मुलींचा जन्मदर आहे. पाच तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक मुलींचा जन्मदर आहे. सडक-अर्जुनी ९७६, सालेकसा ९६९, अर्जुनी-मोरगाव ९६०, आमगाव ९३९ व गोंदिया ९३५ मुलींनी जन्म दर आहे. जिल्ह्यात सन २०१७-१८ मध्ये ९ हजार १७० मुलांनी तर ८ हजार ५४६ मुलींचा जन्मदर आहे.मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी लोकांची मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे. आज मुली शिकून मोठ्या पदावर जात आहे. त्यामुळे मुलगा मुलगी असा भेदभाव न करता त्यांना समान दर्जा देण्याची गरज आहे.-अर्चना वानखेडेजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया.