भूकबळी : सामाजिक संवेदना अजूनही बोथटगोंदिया : तिरोडाच्या जगजीवनराम वॉर्डातील ललिता रंगारी या महिलेच्या अन्नपाण्यावाचून मृत्यू झाला. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने पाच महिन्यांचे पेंशन तिला न दिल्यामुळे तिचा भूकेमुळे बळी गेला. जीवंत व्यक्ती पेंशन घेण्यासाठी गेले ते शासनाला दिसत नाही. पेंशन घेणाऱ्यांना दरवर्षी एप्रिल महिन्यात जीवंत असल्याचा पुरावा बँकेकडे सादर करावा लागतो. ललीता रंगारी संदर्भात हेच घडले. तिने जीवंत असल्याचा पुरावा दाखल केला नाही म्हणून पेंशन दिले नाही असे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने सांगितले. दाखला येताच जानेवारी ते मे अश्या पाच महिन्याचे पेंशन ५ हजार रूपये व मुलगा रितीक याचा २५० रूपयाप्रमाणे १२५० रूपये भत्ता १७ जून रोजी तिच्या खात्यात टाकण्यात आला. एप्रिल महिन्यात जीवंत असल्याचा दाखला द्यावा लागतो. मग जानेवारी महिन्यापासूनच पेंशनचे पैेसे देणे बंद का केले हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र हे प्रकरण अंगावर अलंगट येऊ नये यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातर्फे सारवासारव सुरू आहे. ललीताने लाईफ सर्टीफिकेट बँकेला सादर केले असेल परंतु बँकेमार्फत ते सर्टीफीकेट भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला पोहचले नसेल तर त्यात तिचा काय दोष? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सामाजिक न्याय विभागाकडून मुलांच्या नावे दोन लाख रुपये फिक्स डिपॉझिट केले. (तालुका प्रतिनिधी)बालकांचे संगोपन व्यवस्थित होईल का?ललिताच्या मुलांचे पालकत्व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी स्वीकारले. माध्यमांसमोर पालकत्वाच्या बाबी बोलून पालकमंत्र्यांनी आपली नैतिकता दाखविली. परंतु प्रत्यक्षात त्यांच्याकडे कुणाचे लक्ष नाही. बुध्दघोषच्या राहण्याची व्यवस्था तिरोडा येथे न करता गावापासून दूर नागपूर जिल्ह्याच्या रामटेकच्या काचेवाही येथे करण्यात आली. पुनर्वसनासाठी त्याला तेथे ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. परंतु या प्रकरणाकडे माध्यमांचे दुर्लक्ष व्हावे यासाठी तर त्यांनी हे केले नसावे, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.
दाखल्यासाठी अडविले होते ललिताचे पेन्शन
By admin | Published: July 11, 2015 2:05 AM