शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

लालपरीचे.. दर भारी... वऱ्हाडींची ट्रॅव्हल्सवारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 5:00 AM

अर्धा लग्नसराईचा हंगाम हा एसटीच्या हातून सुटला. आता संप मिटल्यावर लालपरी रस्त्यावर सुसाट धावताना दिसत आहे; परंतु नैमित्तिक कारणांसाठी म्हणजेच विवाह सोहळा, मुलांची सहल नेण्यासाठीदेखील आधी प्राधान्य हे एसटी बसलाच मिळत होते. आज डिझेलचे दर शंभरी पार गेले आहेत. त्यामुळे एसटीनेही आपला किलोमीटर प्रवासाचा दर हा थेट ५५ रुपये प्रतिकिलोमीटर केला, तर दुसरीकडे शिवशाहीचा दर हे ७२ रुपये अधिक जीएसटी, असा निश्चित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस ही जनसामान्यांची प्रवासवाहिनी आहे. त्यात लग्नसराई म्हटली की, वऱ्हाडी मंडळींना विवाहस्थळी नेण्यासाठी एसटीचाच उपयोग होत होता; परंतु एसटीचे दर हे खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेने अधिक असून, त्यात ‘एसी’ अर्थात वातानुकूलिताची व्यवस्था नसल्याने एसटीऐवजी अनेक जण हे खासगी ट्रॅव्हल्सलाच पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. आधीच एसटीचा पाय खोलात असताना मध्यंतरी ६ महिने कर्मचाऱ्यांनी संपूर्ण राज्यभर संप पुकारला होता. त्यामुळेही अर्धा लग्नसराईचा हंगाम हा एसटीच्या हातून सुटला. आता संप मिटल्यावर लालपरी रस्त्यावर सुसाट धावताना दिसत आहे; परंतु नैमित्तिक कारणांसाठी म्हणजेच विवाह सोहळा, मुलांची सहल नेण्यासाठीदेखील आधी प्राधान्य हे एसटी बसलाच मिळत होते. आज डिझेलचे दर शंभरी पार गेले आहेत. त्यामुळे एसटीनेही आपला किलोमीटर प्रवासाचा दर हा थेट ५५ रुपये प्रतिकिलोमीटर केला, तर दुसरीकडे शिवशाहीचा दर हे ७२ रुपये अधिक जीएसटी, असा निश्चित केला आहे. या सर्व दरवाढीमुळे एसटीला पूर्वी हमखास मिळणारे उत्पन्न आता झपाट्याने घटले आहे. नैमित्तिक कारणांसाठी आता एसटी परवडत नसल्याचे दिसते. 

 आता निवडणुकाच तारतील 

- एसटी महामंडळाचे नैमित्तिक उत्पन्न झपाट्याने कमी झाले आहे. तरीही निवडणुकांत एसटीचीच गरज असल्याने एसटी महामंडळाला आता निवडणुकांचा आधार दिसून येतो. - सुरक्षित ईव्हीएम मतदान केंद्र, तसेच मतदान झाल्यावर हेच ईव्हीएम मशीन पुन्हा मतमोजणी ज्याठिकाणी आहे, त्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी अद्याप तरी एसटीचाच उपयोग केला जातो. शिवाय, आता येत्या दिवाळीतही एसटीला उत्पन्नाची संधी आहे. 

वाढते तापमान एसटीची डोकेदुखी - मार्च महिन्यापासूनच पारा ४० अंशावर गेला आहे. त्यात आता मे महिन्यात पारा ४४ अंशावर गेला असून, उकाडा असह्य होत आहे. अशात खासगी ट्रॅव्हल्स कमी भाड्यात व एसीयुक्त मिळत असल्याने अनेक जण वरातीसाठी आता ट्रॅव्हल्सलाच पसंती देताना दिसतात. परिणामी, लग्नाच्या वरातीतून लालपरी बाद झाल्याचे दिसते. 

 असे आकारले जातात दर 

- महामंडळाकडून लालपरीसाठी आता ५५ रुपये प्रतिकिलोमीटरनुसार दर आकारला जात असून, त्यात २०० किलोमीटरपर्यंत दर घेतला जातो. २०० किलोमीटरपेक्षा जास्त गाडी चालल्यास ५५ प्रतिकिलोमीटर गुणिला जेवढे किलोमीटर गाडी चालली तेवढा दर त्यात १८ टक्के जीएसटी व ५० रुपये अपघात निधी जोडला जातो. - शिवशाहीसाठी ७२ रुपये प्रतिकिलोमीटर दर आकारला जात असून, त्यात ३०० किलोमीटरपर्यंत दर घेतला जातो. त्यावर गेल्यास सारखेच गणित असून, येथे ५ टक्के जीएसटी व ५० रुपये अपघात निधी घेतला जातो.

 

टॅग्स :state transportएसटीST Strikeएसटी संप