संतोष बुकावन ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : शेतकरी मोठा असो की लहान, शेती कोरडवाहू असो की बागायती, शेतात धान असो की भाजीपाला, आज निसर्गाच्या कोपामुळे कुणाचेच चालेना. पोशिंद्यांना चहुबाजूंनी वार सहन करावे लागतात. यावर्षी अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालत आहे. काकडी, टरबूजसारखे वेलवर्गीय पीक गेले. कडधान्यही गेले. आता धानालाही किडीने ग्रासले. १५ दिवसात पीक घरात येणार होते ते आता येईल याची शाश्वतीच उरली नाही. बळीराजाचे स्वप्न भंगणार अशीच चिन्ह आहेत.शेतकऱ्यांच्या नशिबात काय लिहिले आहे तेच कळत नाही. आता हेच बघा, काल-परवापर्यंत अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुक्याचा धान उत्पादक शेतकरी खुश होता. धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या या भागात धान शेतीमुळे थोडीफार श्रीमंती नांदत होती. किटनाशकांमुळे धान उगवताना पांढरी ओंबी निघत नाही. आज मात्र किडीच्या अगदी नवीन प्रादुर्भाव दिसून येत आहे. धानाची पूर्ण उगवण झाल्यानंतर सर्व ओंब्या पांढऱ्या-शुभ्र ओंबी निघत आहेत. सर्व शेतं पांढरीची पांढरी होऊ लागली आहेत.अशाही अवस्थेत शेतकरी कृषी केंद्रांवर किटनाशके खरेदीसाठी रांगा लावून आहेत. पण शेती वाचेल हे सांगायला कुणी तयार नाही. धानाची उगवण झाल्यानंतर कधी नव्हे अशी कीड जी यापूर्वी कधीच पाहिली नाही असे शेतकरी सांगतात. यावर्षी एक, दोन दिवस लोटले की अवकाळी पाऊस हजेरी लावतो. काही ठिकाणी वादळवारा व गारपीट होत आहे. यामुळे शेतकरी खचला आहे. या अशा वातावरणाच्या परिणामामुळे काकडी, टरबूज, टमाटर वांगी, मिरची, उडीद मूग, हरभरा ही पिकं उध्वस्त झाली आहेत. धान निघायला आता जेमतेम १५-२० दिवसांचा कालावधी उरला आहे. काल-परवापर्यंत हाच धान बघून यंदा चांगले पीक येणार अशा आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यातच देशावर कोरोनाचे संकट आले.समोर लग्नसराई आहे.शेतात वांगी, काकडी, व वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड करून अधिकचे पैसे कमवायचे या आशेपोटी ओलिताची सोय आहे म्हणून भाजीपाला पिकविला. त्याची काही आॅर्डरही नोंदवून झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमाव व संचारबंदीमुळे सर्व आयोजित विवाहसोहळे रद्द झाले. त्यामुळे घेतलेले आॅर्डरही रद्द झाले. एवढा मोठा शेतमाल विक्र ीला न्यायचा कुठे ? असा प्रश्न शेतकºयांना पडला. हा शेतमाल शेतातच पडून सडला तर वांगी पूर्णपणे पिकून गेली. शेवटी ती फेकून द्यावी लागली. भाजीपाला पिकविणाºया शेतकºयांचे तर वेगळेच हाल आहेत. कोरोनामुळे माल बाजारात आणायची भीती आहे.माल आणला तरी तो विकेलच याची शाश्वती नाही. त्याने बाजारात माल आणण्यासाठी खर्च केलेल्या भाड्याचेही पैसे त्याला माल विकून मिळतीलच अशी हमी नाही. वेलवर्गीय पिकाच्या रुपात नगदी पैसा मिळावा हे शेतकºयांचे स्वप्न पार धुळीस मिळाले. हातीबोटी असलेला पैसा लागवड खर्चात गेला. पदरी काहीतरी पडेल अशी अपेक्षा होती. तीही पूर्णत्वास आली नाही. तोच कोरोनाचा प्रकोप आला. त्याचा सामना करताना आता दमछाक होऊ लागली आहे.शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज द्याभाजीपाला, टरबूज, काकडी पीक गेले. कडधान्यही गेले. आता धानही जाण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी शेतकरी खचला नव्हता. पण कोरोना बरोबरच निसर्गही कोपला. धानपिक सोडून नगदी पैशासाठी काही गुंठ्यात भाजीपाला लागवड केली. पाऊस, वादळवारा व गारपिटीने ते उध्वस्त झाले. १५ दिवसात पीक येईल, समृद्धी नांदेल असे वाटत असतानाच हिरवाकंच धान पांढरा शुभ्र होतांना दिसतो. कोरोनाचे संकट पेलवत असताना हे नवीन संकट आता शेतकºयांसमोर उभे ठाकले आहे.शेतकरी बांधवांनी काय करावं तेच कळत नाही. शेतकºयांना या सर्व संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठे पॅकेज देण्याची मागणी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.
कोरोनासोबतच शेतकऱ्यांवर किडीचे मोठे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 5:00 AM
शेतकऱ्यांच्या नशिबात काय लिहिले आहे तेच कळत नाही. आता हेच बघा, काल-परवापर्यंत अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुक्याचा धान उत्पादक शेतकरी खुश होता. धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या या भागात धान शेतीमुळे थोडीफार श्रीमंती नांदत होती. किटनाशकांमुळे धान उगवताना पांढरी ओंबी निघत नाही. आज मात्र किडीच्या अगदी नवीन प्रादुर्भाव दिसून येत आहे.
ठळक मुद्देनैसर्गिक कोपामुळे तोंडचा घास हिरावण्याची भीती : बळीराजा चिंतातूर