दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : जिल्हा प्रशासनातर्फे शंभर टक्के शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. तर दुसरीकडे मात्र या योनजनेतंर्गत शौचालयांचे बांधकाम करणाºया लाभार्थ्यांना अनुदानासाठी शासकीय कार्यालयाची पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे तालुक्यात स्वच्छ भारत मिशनला अखेरची घरघर लागल्याचे चित्र आहे.प्राप्त माहितीनुसार गोरेगाव तालुक्यात महाराष्टÑ रोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायत अधिनस्थ ३ हजार २७१ शौचालय २०१६-१७ या कालावधीत मंजूर झाले. यापैकी १ हजार ७७२ शौचालयाचे बांधकाम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र आत्तापर्यंय यापैकी केवळ १८९ शौचालयाचेच अनुदान ग्रामपंचायत खात्यात वळते करण्यात आले. तर उर्वरित ८५९ शौचालयाचे अनुदान अद्यापही पंचायत समितीच्या बँक खात्यात वळते करण्यात आले नाही. त्यामुळे लाभार्थी मात्र पंचायत समितीचे उंबरठे झिजवित असल्याचे चित्र आहे.शेतीची आणि महत्त्वाची कामे सोडून लाभार्थ्याना अनुदानासाठी वांरवार तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. मात्र त्यानंतरही कामे होत नसल्याने शौचालयाचे बांधकाम नसते केले तर बरे झाले असते, अशी भावना त्यांच्यात निर्माण होत असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील आसलपानी २९, आंबेतलाव ३२, बबई ८४, बघोली १७, बाम्हणी ५१, बोरगाव १४४, बोटे ३, चिचगाव ६४, चिल्हाटी २३, चोपा ५९, दवडीपार ३६, डव्वा ८, गणखैरा १५, घोटी ३५, घुमर्रा ५८, गोंदेखारी ६७, हिराटोला ९९, हिरडामाली ४१, हौसीटोला २७, झांजीया ११०, कालीमाटी ८९, कलपाथरी १४, कटंगी १०, कवलेवाडा ८, मलपूरी ४४, मसगाव ४७, मोहाडी ३३, मोहगाव (बु.) १०, मुंडीपार २५, निंबा ३९, पालेवाडा ३९, पुरगाव ८६, सटवा ४५, शहारवानी ६४, सिलेगाव ३३, सोनेगाव १, सोनी ४३, तेढा ५८, तेलनखेडी ११, तुमखेडा १४, तुमसर १३ एवढे शौचालयाचे काम सुरु असून यातील १८९ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले.या शौचालयाचे अनुदान ग्रामपंचायतीला प्राप्त झाले असले तरी अनुदानासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. शासनाने स्वच्छ भारत मिशन यशस्वी करण्यासाठी बºयाच योजना राबविल्या मात्र स्वच्छ भारत मिशन अभियान मात्र कागदावरच पहायला मिळत चित्र आहे.गुडमॉर्निंग पथके नावापुरतीचतालुक्यातील सर्वच गावांमध्ये गुडमॉर्निग पथके तयार करण्यात आली आहेत. पण यातील बहुतांश पथके कागदावरच आहेत. त्यामुळे गावा-गावात गुडमार्निग पथकाची दहशत दिसून येत नाही. तर दुसरीकडे मात्र प्रशासनाकडून या अभियानाचा मोठा गाजावाजा करुन स्वत:ची पाट थोपटून घेतली जात आहे.
स्वच्छ भारत मिशनला अखेरची घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 10:24 PM
जिल्हा प्रशासनातर्फे शंभर टक्के शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.
ठळक मुद्देशौचालयाच्या अनुदानासाठी लाभार्थ्यांची पायपीट : पंचायत समितीच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष