गोंदिया : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान गुरूवारी (दि.११) घेण्यात येणार आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील एकूण २ हजार १८४ मतदान केंद्रावरुन १८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. गुरूवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना गोंदिया येथील प्रशासकीय भवनातून निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच कोणत्या कर्मचाºयाची नियुक्ती कुठे करण्यात आली आहे याची यादी सुध्दा येथे लावण्यात आली होती. ती यादी पाहून आपल्या नियुक्त मतदान केंद्रावर पोहचण्यासाठी कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होती. प्रशासकीय भवनातून ईव्हीएम, व्हीव्हीटी पॅट व इतर निवडणूक साहित्य घेवून बाहेर पडताना कर्मचारी. तसेच नियुक्त कर्मचाºयांना मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी बुधवारी (दि.१०) बसेस आणि खासगी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रशासकीय भवनाबाहेर लागली एसटी बसेसची रांग व निवडणूक साहित्य घेण्यासाठी कर्मचाºयांची झालेली गर्दी. तर दिव्यांग मतदारांसाठी सर्वच व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर व्हिलचेअर घेवून जाताना एक वाहन.मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर येथे दिवसभरच वर्दळ पाहयला मिळाली.
लगबग निवडणुकीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 10:34 PM