लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद शाळांतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. परंतु लठ्ठ पगार घेऊनही गुरूजी शाळेत वेळेवर पोहचत नाही. असे वेळकाढू धोरण अंगीकारणारे गुरूजी वेळेवर शाळेत पोहचावे म्हणून चक्क शिक्षण सभापती रमेश अंबुले यांनी ५ व २० जुलै रोजी शाळांना भेट दिली. यात त्यांनी २० लेटलतीफ शिक्षकांना बत्ती दिली आहे.जिल्हा परिषदेचे शिक्षक विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नसल्यामुळे दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालली आहे. गुरूजीच वेळेवर शाळेत पोहचत नसल्याने विद्यार्थी इकडे-तिकडे खेळत असतात. त्या विद्यार्थ्यांना पाहून पालकवर्ग आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांना शिक्षणाची गोडी लावावी म्हणून पैसे खर्च करून खासगी शाळांत टाकतात. परिणामी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालली आहे. हा प्रकार लक्षात घेत व विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण सभापती अंबुले यांनी ५ जुलै रोजी ग्राम दवनीवाडा येथील जिल्हा परिषद हायस्कूलला भेट दिली. यात त्यांना शाळेत कुणीच शिक्षक हजर नसल्याचे दिसले.केंद्रप्रमुख मनोज दिक्षीत यांनी त्या हजेरी रजिस्टरवर सर्व लोक अनुपस्थित असल्याची नोंद सदर दिवशी घेतली आहे. परिणामी मुख्याध्यापकासह ११ शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात केले जाणार आहे. तर २० जुलै रोजी अंबुले यांनी ग्राम पैकाटोला, टिकायतपूर, मजीतपूर व गंगाझरी या शाळांत भेट दिली. मजीतपूर, पैकाटोला व टिकायतपूर या शाळांमध्ये प्रत्येकी दोन शिक्षक, तर गंगाझरी शाळेत तीन शिक्षक गैरहजर आढळले. त्या नऊ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे. प्रशिक्षणाचे नाव सांगून शिक्षक खोटे बोलून शाळेत जात नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेला आल्या आहेत, हे विशेष.मजीतपूरच्या पहिल्या वर्गात एकही विद्यार्थी नाहीशिक्षण सभापती अंबुले यांच्या जिल्हा परिषद क्षेत्रात असलेल्या ग्राम मजीतपूर येथील जिल्हा परिषद शाळेत यंदा पहिल्या वर्गात एकही विद्यार्थ्याचा प्रवेश झाला नाही. शिक्षकांच्या अशा अनागोंदी कारभारामुळे जिल्हा परिषद शाळांत आपल्या पाल्यांना का टाकावे असा पालकांचा सवाल आहे. मजीतपूर येथील चार शिक्षकांपैकी दोन शिक्षक गैरहजरही आढळले आहेत.सीआरसीही असते बंदचशिक्षकांच्या बरोबर केंद्रप्रमुखही गैरहजर राहत असल्याने ग्राम दांडेगाव येथील सीआरसी महिना-महिनाभर बंदच असते. केंद्रप्रमुख स्वत: शिक्षण सभापती यांना सीआरसी मध्ये कधीच भेटले नाही. दांडेगाव केंद्रातील केंद्रप्रमुख व शिक्षक बुट्टी मारण्यात तरबेज असल्याचे बोलले जाते.
लेटलतीफ शिक्षकांना ‘शोकॉज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:07 PM
जिल्हा परिषद शाळांतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. परंतु लठ्ठ पगार घेऊनही गुरूजी शाळेत वेळेवर पोहचत नाही.
ठळक मुद्देशिक्षण सभापतींचा बडगा : २० शिक्षकांवर कारवाईची कुऱ्हाड