शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानाचा शुभारंभ

By admin | Published: May 26, 2017 12:38 AM

येत्या काही दिवसात सुरू होणाऱ्या शेतीच्या हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध माहिती व्हावी.

गावनिहाय मोहीम : १४६ गावात कृषीविषयक मार्गदर्शनलोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : येत्या काही दिवसात सुरू होणाऱ्या शेतीच्या हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध माहिती व्हावी. पारंपरिक शेतीला बगल देत यांत्रिकी पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करुन शेतीची उत्पादकता कमी खर्चामध्ये वाढावी, या हेतूने उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहीम २०१७-१८ अंतर्गत रोहणी नक्षत्रात तंत्रज्ञान प्रचार व प्रसार पंधरवाड्याचा शुभारंभ २५ मेपासून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगावच्या वतीने तालुक्यातील १४६ गावांमध्ये कृषीविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. सदर मोहिमेचा शुभारंभ २५ मे रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी एन.एच. मुनेश्वर, कृषी पर्यवेक्षक आर.के. चांदेवार व एम.बी. ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.त्यानंतर २६ मे रोजी नगरपंचायत कार्यालय अर्जुनी मोरगाव, बोरी, महागाव, इटखेडा, माहुरकुडा, निमगाव, वडेगाव (रेल्वे), झरपडा, पिंपळगाव, नवेगावबांध, देवलगाव, झाशीनगर, पवनी (धाबे.), चान्ना (बाक्टी), सिरेगाव, भिवखिडकी, बाराभाटी, गोठणगाव, प्रतापगड; २९ मे रोजी सावरी, ताडगाव, डोंगरगाव, सिरोली, अरततोंडी, घोटी (पळसगाव), बोळदे, चापटी, पांढरवाणी (माल), येरंडी, चुटीया, जांभळी, बाक्टी, गुंढरी, मुंगली, कुंभीटोला, बोंडगाव (सुर.), रामनगर; ३० रोजी सिंदमधन, इसापूर, काटगाव, मालकनपूर, तावशी, दाभना, महालगाव, धाबेटेकडी, सुरगाव, पांढरवाणी, रय्यत, कवठा, तिडका, बेलोडी, रामपुरी, सोमलपूर, भुरशीटोला, सुकळी, करांडली, केळवद, दिनकरनगर; ३१ मे रोजी नवनीतपूर, खामखुर्रा, मांडोखाल-रॅ., निलज, मोरगाव, बुधेवाडा, कराडगाव, सावरटोला, परसोडी, डोंगरगाव, येरंडी (दर्रे), जब्बारखेडा, येरंडी-देवी, बिडटोला, खैरी, गंधारी, डोंगरगाव, पुष्पनगर अ; १ जूनला मांडोखाल, वडेगाव-बंध्या, येगाव, रामघाट, मोरगाव, सोनेगाव, कन्हाळगाव, तिडका, बोरटोला, चान्ना-कोडका, खोलीगाव, कान्होली, उमरी, बोळदे, सुरबन, उमरपायली, पुष्पनगर (ब), राजोली; २ जून रोजी कोरंभीटोला, कन्हाळगाव, खोळदा, जानवा, तुमडीमेंढा, बोंडगावदेवी, राशीटोला, गंगेझरी, कढोली, वारव्ही, जरूघाटा, इळदा; ३ जूनला कोरंभी, डोंगरगाव, धाबेटेकडी, जांभळी, आंबोरा, खोकरी; ५ जूनला अरुणनगर, सिलेझरी, खांबी, कोहलगाव, संजयनगर, गार्डनपूर, जुनेवारी, घुसोबाटोला, विहीरगाव, केशोरी, गवर्रा, परसटोला, भरनोली, तिरखुरी, आसोली; ७ जूनला इंझोरी, देऊळगाव, माहुली, सोमलपूर, कनेरी, अरततोंडी; ८ जून रोजी बोदरा, धमदीटोला, तुकुमनारायण, डोंगरगाव इत्यादी ग्रामपंचायत कार्यालयात कृषी मार्गदर्शन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. गाव पातळीवरील सभांमध्ये तालुका कृषी अधिकारी डी.एल. तुमडाम, अर्जुनी-मोरगावचे मंडळ कृषी अधिकारी एन.एच. मुनेश्वर, नवेगावबांधचे मंडळ कृषी अधिकारी एस.डी. रामटेके, कृषी पर्यवेक्षक आर.के. चांदेवार, बी.टी. राऊत, एम.बी. ठाकूर, कृषी सहायक पी.एम. सूर्यवंशी, अविनाश हुकरे, पी.बी. काळे, एन.एच. बोरकर, भारती येरणे, मसराम, व्ही. पी. कवासे, जी.सी. पुस्तोडे, नखाते, पी.के. खोटेले इत्यादी कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील. ते गावपातळीवरील शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न वाढविण्याच्या हेतूने, शासनाच्या कृषीसंबंधी विविध योजना, सेंद्रिय व जैविक शेती करण्याचे फायदे आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. मार्गदर्शन अभियानात सहभागी होण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी पत्रकातून केले आहे.