शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

देवीगड पूजनाने कचारगड यात्रेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:26 PM

आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या कचारगड येथे रविवारी (दि.१७) कचारगड यात्रेला सुरुवात झाली. कचारगड गुफेत माँ कली कंकाली देवस्थानात नैसर्गिक पूजन विधी व गड पूजन करुन कचारगड यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देजय सेवाच्या गजराने गुफा परिसर दुमदुमला : आज होणार ध्वजारोहण व मान्यवरांचे आगमन

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या कचारगड येथे रविवारी (दि.१७) कचारगड यात्रेला सुरुवात झाली. कचारगड गुफेत माँ कली कंकाली देवस्थानात नैसर्गिक पूजन विधी व गड पूजन करुन कचारगड यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.५ दिवस चालणाऱ्या या कचारगड यात्रेत ध्वजारोहण व मुख्य आयोजनासह लिंगो बाबाची पालखी सोमवारी (दि.१८) धनेगाव ते कचारगड गुफेपर्यंत काढण्यात येईल. यासाठी आदिवासी समाजाचे भूमकाल (पुजारी) कचारगड येथे दाखल झालेले आहेत. मध्य भारतातील विविध प्रांतातून मोठ्या संख्येने भाविकांचे व त्या क्षेत्रातील भूमकाल विधिवत पूजनासाठी कचारगडच्या पवित्र भूमीवर उतरले आहेत. रविवारी पहिल्याच दिवशी ५० हजारच्यावर भावीक कचारगड येथे उतरले असून ‘जय सेवा’चा गजर धनेगाव ते कचारगडपर्यंत ऐकू येवू लागला होता.सोमवारी (दि.१८) गोंडराजे वासुदेव शाह टेकाम यांच्या हस्ते सप्तरंगी शेंडा तर आमदार संजय पुराम यांच्या हस्ते गोंडवाना साम्राज्याचा ध्वज फडकविण्यात येईल. तर गोंडी भूमकाल यांच्या मार्गदर्शनात नैसर्गिक पूजन विधी करुन जंगो लिंगो द्वारावरुन लिंगो बाबाची पालखी निघणार. यावेळी गोंड आदिवासी समाजातील विविध मान्यवर मंडळी उपस्थित राहून आपली दृढ आस्था व श्रद्धा व्यक्त करीत माँ कली कंकालीच्या पूजेत सहभागी होतील.दुपारी मुख्यमंत्र्यांचे आगमनसोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भृपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांचे दुपारी हेलीकॉप्टरने आगमन होणार आहे. त्यांच्या हस्ते कचारगड कोयापूनेम महोत्सवाचा शुभारंभ होणार असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रोत्साहनाने आयोजित अटल आरोग्य शिबिराचा सुद्धा प्रारंभ करण्यात येईल. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी आपापल्या वेगवेगळ्या हेलीकॉप्टरने येथे उतरणार असून सशस्त्र दूर क्षेत्र दरेकसा येथील कॅम्प लगत दोन वेगवेगळे हेलीपॅड तयार करण्यात आले आहेत. या व्यतिरीक्त गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव, गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले, खा. अशोक नेते, आ. संजय पुराम यांच्या सह अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी उतरणार असून येथील व्यवस्थेबद्दल आ. पुराम जातीने लक्ष देत आहेत.अधिकाऱ्यांची भेटमुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांची कचारगड भेट लक्षात घेता व कचारगड परिसर अतिसंवेदनशील असल्याने रविवारी दिवसभर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व्यवस्था पाहणी करण्यात व्यस्त राहिले. जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ए. राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक हरिश बैजल, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांच्या सह सर्व विभागांच्या अधिकाºयांनी कचारगडला येवून धनेगाव येथील कार्यक्रम परिसरात आयोजनाच्या तयारीच्या आढावा घेतला. राज्याचे शासन प्रमुख आणि लाखोच्या घरात येणाºया भाविकांची संख्या लक्षात घेत दरेकसा धनेगाव परिसरात हजारोंच्या संख्येत राज्य पोलीस, एसआरपी, सीआरपीएफ व इतर सुरक्षा जवान तैनात करण्यात आले असून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले.

टॅग्स :Kacharagarh templeकचारगड देवस्थान