लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव : तालुक्यातील ग्राम तुमसर येथील मामा तलावातील गाळ उपसा कार्यक्रमाचा शुभारंभ नायब तहसीलदार एस.एम.नागपुरे व नायब तहसीलदार जी.आर.नागपुरे यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१६) करण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी बारसे, बघेले, तलाठी व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार नागपुरे यांनी शासनाच्या तलाव व धरणातील गाळ उपसा योजनेचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ आपल्या शेतात टाकून जमीन सुपीक करावी. तसेच तलावातील जलस्तर वाढवून शेतीला पुरेसे पाणी व्हावे याच उद्देशाने शासनाने गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शेतशिवार ही उपयुक्त योजना हाती घेतली आहे. अनेक वर्षापासूनच संचित गाळ हा सोनखतच आहे. त्यामुळे सर्व तलावातील गाळ खाली करुन गाळमुक्त तलाव करावे असे मत व्यक्त केले.
गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ
By admin | Published: May 19, 2017 1:34 AM