सामाजिक न्यायमंत्री बडोले : गाळ साचल्याने साठवण क्षमता झाली कमीसडक-अर्जुनी : तालुक्यातील खैरी मालगुजारी तलाव विशेष दुरूस्ती व पुनर्स्थापना कामाचा शुभारंभ तलावाच्या धरणस्थळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम हरितक्रांती पाणी वापर सहकारी संस्था खोडशिवनी-खैरी व पाटबंधारे विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले.याप्रसंगी प्रामुख्याने कार्यकारी अभियंता एन.के. ढोरे, उपविभागीय अभियंता ए.एच. डोंगरे, तहसीलदार परूळेकर, माजी सरपंच माधवराव परशुरामकर, पोलीस पाटील भृंगराज परशुरामकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पतिराम परशुरामकर, उपसरपंच मनोहर परशुरामकर, उपसरपंच शिवदास परशुरामकर, पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष महादेव कापगते, सचिव अॅड. प्रकाश परशुरामकर, विलास समरित व दोन्ही गावातील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी ना. बडोले म्हणाले, आपली शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. शासनस्तरावर दुष्काळ नियोजनाचे उपाय केले जातात. परंतु निसर्ग कोणाच्या हाती नाही. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी ३०० वर्षांपूर्वी ज्या मालगुजारी तलावांची निर्मिती केली, त्यांच्यात आता गाळ साचल्यामुळे त्यांची साठवण क्षमता कमी झाली आहे. तसेच त्यांचे कालवे जीर्ण झाले आहेत. गेटचे बांधकाम करणे गरजेचे झाले आहे.त्यासाठी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मालगुजारी तलावांकरिता शासनाने १०० कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. याच निधीमधून मालगुजारी तलावांची साठवन क्षमता वाढवून काही प्रमाणात दुष्काळावर मात करण्यात येईल. याकरिता जिल्ह्यातील सर्व मालगुजारी तलावांची दुरूस्ती करण्यात येईल. त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे ते म्हणाले.याप्रसंगी कार्यकारी अभियंता ढोरे यांनी सांगितले की ९० लाख रूपये खर्चून खैरी तलावाची गाळ काढण्याचे कार्य पूर्ण झाले असून यानंतर गेट, पाटचाऱ्या व कालव्यांचे बांधकाम करण्यात येईल.संचालन भृंगराज परशुरामकर यांनी केले. आभार मनोहर परशुरामकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाखा अभियंता व्ही.एम. श्रीवास्तव, माधवराव परशुरामकर, ज्ञानिराम बन्सोड, सुभाष मेश्राम, वरखडे व हरित क्रांती पाणी वापर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
मालगुजारी तलावांची दुरूस्ती व पुनर्स्थापना कामाचा शुभारंभ
By admin | Published: January 12, 2016 1:41 AM