मनोज ताजने / गोंदियागजबजलेल्या जयस्तंभ चौकातील उपवनसंरक्षकांच्या कार्यालयाच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडून असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. त्यामुळे वनविभागाचे हे कार्यालय रात्रीच्या वेळी मदिरालय तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वनविभागाच्या या कार्यालयात उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, तसेच सहायक वनसंरक्षक नरेंद्र शेंडे आणि सहायक वनसंरक्षक यु.टी.बिसेन हे अधिकारी व त्यांचा जवळपास २५हून जास्त कर्मचाऱ्यांचा स्टाफ कार्यरत आहे. या कार्यालयाच्या मागील बाजूस वनविभागाच्या वाहनांचे जुने टायर्स एकावर एक रचून ठेवलेले आहेत. या टायर्सच्या आतील पोकळ भागात विदेशी दारूच्या अनेक बाटल्या ठेवल्या होत्या.राजेश तायवाडे हे जागरूक नागरिक कामानिमित्त या कार्यालयात गेले होते. मात्र त्यावेळी लंचटाइम सुरू असल्यामुळे ते कार्यालयाच्या आवारात फिरत असताना त्यांना या बाटल्या दिसल्या. त्यांनी लगेच ‘लोकमत’ला ही माहिती दिली. याच सहायक वनसंरक्षक यु.टी. बिसेन हे कार्यालयात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात कर्मचाऱ्यांना खडसावून या बाटल्यांची विल्हेवाट लावण्याची सूचना केली.
वनअधिकाऱ्यांच्या कार्यालय आवारात दारूच्या बाटल्या!
By admin | Published: February 21, 2017 3:55 AM