आमगाव : शिक्षणमहर्षी लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांची जयंती ४ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता भवभूती महाविद्यालय आमगाव येथे साजरी होणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले हे जयंती महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. अतिथी म्हणून उच्चशिक्षण नागपूर विभागाचे सहसंचालक डॉ. अंजली राहाटगांवकर, प्रांत प्रचारक रा.स्व. संघ विदर्भ प्रांत नागपूरचे प्रसाद महानकर, खासदार अशोक नेते, आ. संजय पुराम उपस्थित राहतील.याप्रसंगी नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य गिरीष व्यास, परिणय फुके, नगराध्यक्ष अशोक इंगळे गोंदिया, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे तिरोडा यांचा सत्कार होणार आहे. सोबत माजी खासदार हरीश मोरे, डॉ. गजानन डोंगरवार, नटवरलाल गांधी, नाना नाकाडे, भरत क्षत्रिय, चि.तू. पटले यांचाही सत्कार होणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना संधी टापर्स अॅवार्ड, भवभूती महाविद्यालयाच्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती महोत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भवभूती शिक्षण संस्थेचे कार्यवाह माजी आ. केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेशबाबू असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार, संचालक मंडळ व समारोह संयोजक डॉ. श्रीराम भुस्कुटे, प्राचार्य डॉ. डी.के. संघी, मुख्याध्यापक डी.एम. राऊत, रंजित डे, एम.एन. कोटांगले यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी) संघी टॉपर्स अवॉर्ड संघी परिवार गोंदियातर्फे प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना संघी टॉपर्स अवॉर्डने गौरविण्यात येते.यंदाही या पुरस्काराचे वितरण शिक्षण महर्षी लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंतीनिमित्त शनिवारी भवभूती महाविद्यालय, आमगाव येथे होणार आहे. या पुरस्कारासाठी लक्ष्मणराव मानकर इंन्स्टीट्यूट आॅफ फार्मसीचे विद्यार्थी विपुल वसंता पडोले, ज्योती गुलाबराव बिसेन, तंत्रनिकेतनचा विद्यार्थी अभिशेख पिमेश्वर कटरे, आदर्श विद्यालय आमगाव बारावी विज्ञानची विद्यार्थिनी शामली संतोष मिश्रा, आदर्श विद्यालय येथील दहावीची विद्यार्थिनी मानसी तामेश्वर रहांगडाले व भवभूती महाविद्यालयातून बीएससीमधून रोशनी घनश्याम मेंढे यांना गौरविण्यात येणार आहे.
लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती ४ रोजी
By admin | Published: February 03, 2017 1:43 AM